
U19 WC: Video पाहून युवराज भडकला; शामसीनेही दिले प्रत्युत्तर
वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षाखाली वर्ल्डकपमध्ये युगांडा U19 आणि पापुआ न्यू गिनी U19 यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात गोलंदाज जोसेफ बगुमा (Joseph Baguma) ने मंकडिंगद्वारे फलंदाज जॉनी कारिकोला बाद केले. याबाबतचा व्हिडिओ (Video) आयसीसीने (ICC) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. मात्र हा व्हिडिओवर भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) कमेंट केल्यानंतर तो जास्त चर्चेत आला. (U19 World Cup Mankad by Joseph Baguma Video Yuvraj Singh Commented Tabraiz Shamsi Counter Him)
हेही वाचा: ICC U19 WC: निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह, उपांत्यपूर्व फेरीला मुकणार
युवराज सिंगने या व्हिडिओवर 'एकदम खराब' अशी कमेंट केली. युवराजला १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्येही अशा प्रकारे गोलंदाज फलंदाजाला बाद करत असल्याचे रूचले नाही. मात्र दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शामसीने (Tabraiz Shamsi) युवराजच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देत काऊंटर केले.
शमसी आपल्या कमेंटमध्ये लिहितो की, 'जर फलंदाज चेंडू टाकण्याआधीच क्रीज सोडत असेल आणि गोलंदाजाने त्याला मंकडिंग करून बाद केले तर याच्यात काही गैर नाही. गोलंदाज जर चेंडू टाकताना चुकून क्रीजच्या १ मिलिमिटर जरी पुढे गेला तरी चेंडू नो बॉल ठरवला जातो आणि फलंदाजाला फ्री हिट मिळते. त्यामुळे फलंदाजाने देखील क्रीजच्या मागेच असले पाहिजे.'
हेही वाचा: आमच्याकडे अनेक कॅप्टन पण, रिझल्ट हा मुद्दा आहे : शमी
या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनी संघाचा ३५ धावांनी पराभव केला. मात्र सामन्यातील जोसेफ बगुमाने मंकडिंगद्वारे घेतलेल्या विकेटचीच चर्चा जास्त झाली. अनेक क्रिकेट चाहत्यांनीही या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली.
Web Title: U19 World Cup Mankad By Joseph Baguma Video Yuvraj Singh Commented Tabraiz Shamsi Counter Him
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..