esakal | Euro 2020 : तुर्कीविरुद्ध इटलीची विक्रमी विजयासह सलामी!
sakal

बोलून बातमी शोधा

Italy vs Turkey

Euro 2020 : तुर्कीविरुद्ध इटलीची विक्रमी विजयासह सलामी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

UEFA EURO 2020, Italy vs Turkey Result : चारवेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि ग्रुप 'अ' मधील तगडी टीम असलेल्या इटलीने सलामीच्या सामन्यात तुर्कीला एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात 3 गोल नोंदवत इटलीने धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिलाय. इटलीचा स्टार स्ट्रायकर सिरो इमोबिल आणि इन्सिग्ने यांनी प्रत्येकी एक-एक गोल डागला. तर तुर्कीच्या देमिरालने स्वंयगोल करत संघाच्या अडचणीत भर घातली. इटली आणि तुर्की यांच्यात आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात इटलीने 8 वा विजय नोंदवला आहे. या दोन्ही संघातील 3 सामने अनिर्णित देखील राहिले आहेत. इटली विरुद्ध पहिल्या विजयाचा तुर्कीची प्रतिक्षा कायम राहिली आहे. (UEFA EURO 2020-Italy-record-the-biggest-victory- against-Turkey-Loss-by-3-0-in-an-opening-game)

या विजयासह इटलीने रोममध्ये मोठ्या स्पर्धेत पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला. इटलीने युरो आणि फिफा वर्ल्ड कपसह स्टेडिओ ओलिंपिकोच्या मैदानात 9 सामने खेळले आहेत. यात 7 सामन्यात विजय तर 2 सामने अनिर्णित राखण्यात त्यांना यश आले आहे. मागील 8 सामन्यात या मैदानावर खेळताना इटलीने प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल डागू दिलेला नाही.

हेही वाचा: क्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल

इटलीच्या संघाला युरो कपमधील आपल्या मागील 9 ओपनिंग ग्रुप स्टेज मॅचमध्ये केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याउलट तुर्कीला मागील 5 ओपनिंग ग्रुप स्टेज मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. यात इटली आणि तुर्की यांच्यातील 2000 ओपनिंग ग्रुप स्टेजच्या मॅचचा समावेश असून यावेळीही तुर्कीला पराभव स्वीकारावा लागला होता. 2000 च्या यूरो कपमध्येही इटली आणि तुर्की यांच्यात सलामीचा सामना रंगला होता. 11 जून 2000 मध्ये रंगलेल्या या सामन्यात तुर्कीने 2-0 अशा फरकाने सामना गमावला होता. तुर्कीची मागील 21 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा तिसरा पराभव ठरला. त्यांनी 10 सामने जिंकले असून 9 सामने अनिर्णित राखले आहेत.

हेही वाचा: Euro Cup चा इतिहास आणि चक्रावून सोडणाऱ्या Prize Moneyची गोष्ट;पाहा व्हिडिओ

इटलीने पहिल्यांदाच युरो कप स्पर्धेत 2 पेक्षा अधिक गोल डागण्याचा पराक्रम केला.यापूर्वी इटलीने या स्पर्धेत 38 सामने खेळले होते. पण यातील एकाही सामन्यात त्यांना दोन पेक्षा अधिक गोल करता आला नव्हता. युरो कप स्पर्धेत सर्वाधिक मॅचेस ड्रॉ करण्याचा विक्रम देखील इटलीच्या नावेच आहे. याशिवाय टीमने 8 सामने गोरशिवाय बरोबरीत राखले आहेत.

पहिला हाफ गोलशिवाय

इटलीच्या संघाने सुरुवातीपासून आक्रमण करण्यावर भर दिला. तुर्कीच्या डिफेंडर्संना इटलीला रोखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. हाफ टाईमपर्यंत कोणालाही गोल करता आला नाही. पहिल्या हाफमध्ये इटलीने 14 शॉट्समध्ये 3 ऑन टार्गेट लगावले. पण तुर्कीचा गोलकिपर सकीरने ते यशस्वीरित्या रोखले.