BAN vs PAK | VIDEO : शाकिबचा निर्णय मानण्यास नकार! पंचांनी धक्के मारत शाकिबला काढले बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umpire Push Bangladesh Skipper Shakib Al Hasan

BAN vs PAK | VIDEO : शाकिबचा निर्णय मानण्यास नकार! पंचांनी धक्के मारत शाकिबला काढले बाहेर

Umpire Push Bangladesh Skipper Shakib Al Hasan : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा खराब पंचगिरीचा नमुना पहावयास मिळाला. यावेळी मैदानावरील नाही तर चक्क तिसऱ्या पंचांनी मोठी चूक केली. यामुळे बांगलादेशचा कर्णधार पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. शादाब खान टाकत असलेल्या या 11 व्या षटकातील ड्राम्यानंतर शाकिब मैदान सोडण्यास तयार नव्हता. त्यावेळी मैदानावरील पंचांनी त्याला जवळपास ढकलून मैदानाबाहेर काढले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशकडून सरकार आणि शांतो यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी (52) भागीदारी रचली. ही जोडी पाकिस्तानची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शादाब खानने सामन्याच्या 11 व्या षटकात सौम्या सरकारला 20 तर कर्णधार शाकिबला पुढच्याच चेंडूवर शुन्यावर बाद करत बांगलादेशला दोन मोठे धक्के दिले. शाकिबचा निर्णय वादग्रस्त ठरला. एकतर मैदानावरील पंचांनी पायचित बाद असलेला निर्णय खूप उशीराने दिला.

त्यानंतर शाकिबने वेळ न दडवडचा लगेचच डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये चेंडू शाकिबच्या बॅटला लागून गेल्याचे दिसत होते. स्निकोमिटरवर स्पाईक स्पष्टपणे दिसत होते. मात्र तरी देखील तिसऱ्या पंचांनी शाकिबला बाद ठरवले. यानंतर शाकिबने निर्णयावर नाराजी व्यक्त करत मैदानातील पंचांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मात्र तिसऱ्या पंचांनी एकदा निर्णय दिला की तो निर्णय कोणत्याही परिस्थिती मागे घेता येत नाही. त्यामुळे मैदानावरील पंचांनी शाकिबची समजूत काढत बाहेर जाण्यास सांगितले. दरम्यान, नाराज शाकिब मैदान सोडण्यात तयार नव्हता त्यावेळी पंचांनी शाकिबला थोडे ढकलतच त्याला सक्तीने मैदान सोडण्यास भाग पाडले.

दरम्यान, पाकिस्तानने बांगलादेशचे 128 धावांचे आव्हान पार करताना 10 षटकात 57 धावांची सावध सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशने जोरदार पुनरागमन करत बाबर आझमला 25 तर मोहम्मद रिझवानला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानची धवगती मंदावली. तसेच मोहम्मद नवाझ देखील 11 चेंडूत 4 धावा करून धावबाद झाला.