
BAN vs SL: live मॅचमध्ये अंपायर मैदानाबाहेर; कारण खूप त्रासदायक
Bangladesh vs Sri Lanka: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील या कसोटी मालिकेतील पहिला सामना चटगाँव येथे खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये चौथ्या दिवशी एक विचित्र घटना घडली. अंपायर रिचर्ड केटलबरो यांना प्रकृती बिघडल्यामूळ मैदान सोडावे लागले.
चटगाँवमधील उष्णतेचा अंपायर रिचर्ड केटलबरो वर परिणाम झाला. त्यांना उष्णता सहन झाली नाही. रिचर्ड केटलबरो यांना खेळाच्या 139व्या ओव्हरमध्ये मैदान सोडावे लागले. त्यानंतर अंपायर जो विल्सन त्यांनी त्यांच्या जागी मैदानात आले. या घटनेनंतर खेळाडूंनी ड्रिंक ब्रेक घेतला. त्यावेळेस उष्णतेपासून वाचण्यासाठी खेळाडू मोठ्या छत्र्याखाली पाणी पिताना होते. यावरून तुम्ही उष्णतेचा अंदाज लावू शकता.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झालं तर, श्रीलंकाने पहिल्या डावात मॅथ्यूजच्या 199 धावांच्या जोरावर 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 465 धावा केल्या. बांगलादेशकडून तमिम इक्बालने 133 आणि मुशफिकर रहीमने 105 धावा केल्या.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात 2 बाद 39 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंका अजूनही २९ धावांनी मागे आहे. चार दिवसांचा खेळ संपला. अशा परिस्थितीत आता हा कसोटी सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.