उमरानला इतके प्रेम दिल्याबद्दल देशाचा आभारी, वडिलांची भावूक प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

umran malik father reaction after selection in india t20 team against south africa

उमरानला इतके प्रेम दिल्याबद्दल देशाचा आभारी, वडिलांची भावूक प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी रविवारी (22 मे) 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. याच जम्मूचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (umran malik) याचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीनंतर सोशल मिडीयामध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय, तसेच उमरानच्या वडीलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयने ट्विटर पोस्टद्वारे भारतीय संघाची घोषणा करताच, उमरान मलिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागला, कारण चाहत्यांकडून आणि माजी क्रिकेटपटूंकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे उमरान चर्चेत आला होता.

उमरान मलिकचे कुटुंब आणि मित्रांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताच्या संघात उमरानची निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. सोबतच उमरानच्या वडीलांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, "त्याला (उमरान) इतके प्रेम दिल्याबद्दल मी देशाचा आभारी आहे. हे सर्व त्याच्या मेहनतीमुळे आहे. तो देशाचा गौरव वाढवेल", असे म्हटले आहे.

हेही वाचा: उमरान मलिक आता भारताची 'स्टेन गन', दक्षिण आफ्रिकेविरूद्ध धडाडणार

अपेक्षेप्रमाणे, अनेक खेळाडू ज्यांनी 2022 इंडियन प्रीमियर लीग(IPL) च्या हंगामात चमकदार कामगीरी केलेला सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक, ज्याने आपल्या जलद गतीने, 150kmph चा टप्पा ओलांडून स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यामुळे त्याला प्रथमच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. जम्मू शहरातील या 22 वर्षीय क्रिकेटपटूने लीगच्या चालू हंगामातील 13 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान हे पाच T20I सामने अनुक्रमे 9, 12, 14, 17 आणि 19 जून रोजी दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बेंगळुरू येथे होणार आहेत.

हेही वाचा: केएल राहुलच्या गळ्यात भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदाची माळ

Web Title: Umran Malik Father Reaction After Selection In India T20 Team Against South Africa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top