ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट गडद...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्वानाच घरात बंदिस्त केले आहे. विषाणूच्या संसर्गाने जगभरातील सर्व देशांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरवात झालेल्या या विषाणूचा संसर्ग बघता बघता संपूर्ण जगभर झाला असून, सगळ्याच देशात यामुळे भीतीचे वातावरण आहे. याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धां आणि त्यांच्या संघटना यांना आपल्या खेळाचे नियोजन अंशतः बदलावे लागले आहे, तर काही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्वानाच घरात बंदिस्त केले आहे. विषाणूच्या संसर्गाने जगभरातील सर्व देशांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरवात झालेल्या या विषाणूचा संसर्ग बघता बघता संपूर्ण जगभर झाला असून, सगळ्याच देशात यामुळे भीतीचे वातावरण आहे. याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धां आणि त्यांच्या संघटना यांना आपल्या खेळाचे नियोजन अंशतः बदलावे लागले आहे, तर काही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. अशातच आता २४ जुलै २०२० मध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धां आगामी वर्षी २०२१ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जर पुढील वर्षी देखील ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन न जमल्यास स्पर्धाच रद्द करण्याची घोषणा ऑलिम्पिक समितीकडून करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २४ जुलै २०२० पासून सुरु होणारी ऑलिम्पिक स्पर्धां पुढच्या वर्षी २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय ऑलिम्पिक समितीकडून घेण्यात आला होता. परंतु आता २०२१ मध्ये देखील ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणे शक्य नसल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी ऑलिम्पिक समितीला कळवल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग असेपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणे धोक्याचे असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे २०२१ मध्ये देखील ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात न झाल्यास स्पर्धाच रद्द करण्याची घोषणा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी केली आहे. २०२१ मधील  जगभरातील परिस्थितीचे आकलन आत्ताच होणे शक्य नसल्याने तेंव्हाच निर्णय घेण्यात येईल अथवा स्पर्धाच रद्द करावी लागू शकते, असे मत थॉमस बॅच यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे असून, जपानच्या टोकियो मध्ये या स्पर्धा रंगणार होत्या. आता मात्र टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट गडद होताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncertainty looms large over the Olympics