
भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा संघर्ष पहायला मिळणार आहे.
केपटाऊन : भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा संघर्ष पहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानावरील एकमेकांचे कट्टर विरोधी संघ पुन्हा भीडणार आहेत. पण 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
क्वार्टर फायनरलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करून, सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्ताननं अफगाणिस्तावर आज, विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. या सेमीफायनलमुळं भारत-पाकिस्तानपैकी एकच आशियायी देश फायनलमध्ये पोहोचणार आहे. आज पाकिस्तानचा सलामीवीर मुहम्मद हुरैराच्या आणि आक्रमक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्ताननं अफगाणिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलं.
यापूर्वी २०१८च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव झाला होता. तर, दुसरीकडं भारत हा चार वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे पाकिस्तानचा भारतीय खेळाडूं पुढं टिकाव लागलात का?, असा प्रश्न पाकिस्तानी चाहत्यांना पडला असावा. ग्रुप ए मध्ये भारताने अ गटात विजयासह (श्रीलंका, जपान आणि न्यूझीलंडवर) अव्वल स्थान पटकावले, तर क गटातील पाकिस्तानने बांगलादेश, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडचा पराभव केला आहे.
19 खालील विश्वकरंडक
भारत - २०००, २००८, २०१२
पाकिस्तान - २००४ आणि २००६