दहावी असूनही ध्येय सुवर्णपदकाचे!

आदित्य वाघमारे  
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे - एकीकडे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे राज्यासाठी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे सुवर्णपदक टिकविण्याचे ध्येय, अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ करतोय. खेलो इंडियासाठी १७ वर्षांखालील संघात निवड झालेल्या १२ खेळाडूंपैकी सहा मुली या दहावीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या दोन्ही आव्हानावर पाय ठेवून पुढे जाण्यासाठी या मुली सध्या खेळ आणि वेळ मिळाला की अभ्यास, अशी दुहेरी कसरत करत आहेत. 

आपल्याकडे अजूनही खेळाला महत्त्व नाही. मैदानावर वळण्याऐवजी आजचा विद्यार्थी एकतर पाठीवरच्या ओझ्यात आणि दुसरीकडे मोबाईलच्या जाळ्यात अडकला आहे. यातूनही पालकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अनेक विद्यार्थी खेळातही कारकीर्द घडवत आहेत. आधी खेळ, नंतर अभ्यास; तर कधी आधी अभ्यास नंतर खेळ, असा सल्ला या मुलींना मिळत असतो. पण, या दोन्ही चौकटीत बसून या मुली दोन्ही आघाड्यांवर आपली आगेकूच करीत आहेत. त्यामुळेच खो-खो संघातील सहा मुली आपल्या खेळाच्या किटबरोबर दप्तरही घेऊन आल्या आहेत.  नियती बंगाल (पुणे), दीक्षा सोनसुरकर (ठाणे), रितिका मकदूम (सांगली), गौरी शिंदे (उस्मानाबाद), किरण शिंदे (उस्मानाबाद), साक्षी करे  (इंदापूर) या सतरा वर्षांखालील मुली सध्या दहावीच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. स्पर्धा पूर्व सराव शिबिर सुरू असताना आम्ही दोन तास किमान अभ्यासाला देत होतो, आता स्पर्धेमुळे हा वेळ निम्म्यावर आला असल्याचे नियती सांगते. वैयक्तिक अभ्यास सुरू आहेच, पण ग्रुप स्टडीवर भर देऊन आपण एकत्रितपणे अभ्यास करीत आल्याचे तिने सर्वांच्या वतीने सांगितले. 

जिंकणार तर सुवर्णच
महाराष्ट्र खो-खोतील सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. या मुलींचे इरादेसुद्धा तेवढेच बुलंद आहेत. जिंकणार तर आहोतच आणि जिंकू तर सुवर्णपदकच, असा निर्धार या मुलींनी व्यक्त केला. याबरोबर दहावीच्या परीक्षेतसुद्धा चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under 17 girls team of Maharashtra Goal gold medal in kho-kho kehlo india