US Open 2025 : यानिक सिनर उपांत्यपूर्व फेरीत, अमेरिकन ओपन; बुबलिकवर सहज मात
Jannik Sinner : अमेरिकन ओपनमध्ये यानिक सिनरने बुबलिकचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर नाओमी ओसाकाने कोको गॉफला हरवत मोठा उलटफेर घडवला.
न्यूयॉर्क : गतविजेत्या यानिक सिनर याने सोमवारी मध्यरात्री झालेल्या अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरीच्या लढतीत ॲलेक्झँडर बुबलिक याच्यावर सरळ तीन सेटमध्ये मात केली आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.