esakal | ‘मूर्खपणा’त्सित्सिपासने आदर गमावला | Andy Murray
sakal

बोलून बातमी शोधा

अँडी मरेची

‘मूर्खपणा’ त्सित्सिपासने आदर गमावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : ब्रिटनचा तीन वेळ ‘ग्रँड स्लॅम’ विजेता अँडी मरे याला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ग्रीसच्या स्टेफिनोस त्सित्सिपासकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान त्सित्सिपासने वारंवार घेतलेल्या मोठ्या ‘ब्रेक्स’चा (विश्रांती) ‘मूर्खपणा’ असा उल्लेख मरेने या वेळी केला आहे. ‘त्सित्सिपासने सामन्यात घेतलेल्या वेळखाऊ ‘बाथरूम ब्रेक्स’मुळे सामन्यात अनेकदा व्यत्यय आला आणि त्याचाच परिणाम सामन्याच्या निकालावर झाल्याचे मरेने या वेळी म्हटले आहे. तसेच या सर्व प्रकारानंतर ‘त्सित्सिपासने माझ्या मनातील आदर गमावला आहे,’ अशी टीकाही मरेने केली.

तब्बल चार तास आणि ३९ मिनिटे इतक्या वेळ चाललेल्या या सामन्यात त्सित्सिपासने मरेवर २-६, ७-६ (९/७), ३-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. त्सित्सिपासच्या वेळखाऊ ‘ब्रेक्स’बद्दल सिनसिनाटी ओपनमध्येही प्रतिस्पर्धी खेळाडूकडून टीका करण्यात आली होती. या पराभवानंतर मरे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या सामन्यात मरेने दोनदा आघाडी घेतली होती. जवळपास पाच तास लांबलेल्या या सामन्‍यात मरे पूर्णपणे घामाने भिजला होता; तसेच त्याचे बूटही खामाने ओले झाले होते. त्यामुळे त्याचा अनेकदा तोल जात होता; तरीही त्याने प्रचंड उत्साह दाखवत शेवटपर्यंत संघर्ष केला; मात्र त्याचा हा संघर्ष अपुरा ठरला.

हेही वाचा: बीसीसीआय होणार आणखी मालामाल

ओसाकाची विजयी सलामी

मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा मध्येच सोडणाऱ्या जपानच्या अव्वल नाओमी ओसाकाने विजयी सुरुवात केली आहे. तिने महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोझुकोवावर ६-४,६-१ ने विजय मिळवला आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळलेला हा सामना जिंकल्यानंतर ओसाका म्हणाली, ‘पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये खेळणे चांगले आहे. मला इथे खेळताना खूप चांगले वाटले.’

loading image
go to top