esakal | मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

sakal_logo
By
नामदेव कुंभार

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर मर्यादीत सामन्याचं (टी20 आणि एकदिवसीय) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्माकडे टी-20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराट कोहली हा मोठा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहलीने या मुद्द्यावर रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसोबत दीर्घ चर्चा केली आहे. विराट कोहली स्वत: टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करु शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

32 वर्षीय विराट कोहली भारताच्या यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. देशात आणि विदेशात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक ऐतिहासिक विजय संपादन केले आहेत. मात्र, विराट कोहलीला अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकरात भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बाप झाल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा मोठा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली याची स्वत: घोषणा करण्याची शक्यता आहे. विराटच्या मते, फलंदाजीवर आणखी लक्ष देण्यासाठी आणि जगभरातील सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. त्यासाठी पूर्णपणे फलंदाजीवर फोकस करण्याची गरज आहे.

हेही वाचा: भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिलेय. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला अद्याप एकदाही चषक जिंकता आलेला नाही. कर्णधार म्हणून विराटला अद्याप एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 95 एकदिवसीय सामन्यात 65 विजय संपादन केले आहेत. तर 45 टी-20 सामन्यात 29 विजय मिळवले आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने अनेकदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत भारतीय संघाने अव्वल कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातात 10 एकदिवसीय सामन्यात भारताने 8 विजय मिळवले आहेत. तर 19 टी-20 सामन्यापैकी 15 सामन्यात भारताचा विजय झाला आहे.

हेही वाचा: गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल; आज शपथविधी

दुबई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टी-20 चा थरार रंगणार आहे. त्यानंतर विराट कोहली मर्यादीत सामन्याचं नेतृत्व सोडण्याची शक्यता आहे. या टी-20 विश्वचषकानंतर पुढील दोन वर्ष विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. र 2023 मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. अशापरिस्थिती रोहित शर्माला तयारीसाठी वेळ हवा आहे. त्यामुळे विराट कोहली तडकाफडकी मर्यादीत षटकांच्या सामन्याचं नेतृत्व सोडू शकतो.

loading image
go to top