FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

USA Secure Knockout Stage Spot: अमेरिकेने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करत विश्वकरंडक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. सलग दुसऱ्या विजयासह अमेरिकेची विजयी घोडदौड कायम.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

esakal

Updated on: 

सीटल ः सहयजमान अमेरिकेने लागोपाठ दुसरा सामना जिंकून विश्वकरंडक स्पर्धेच्या ड गटातून बाद फेरी पक्की केली. विजयी घोडदौड राखताना त्यांनी ऑस्ट्रेलियाला २-० फरकाने नमविले. अगोदरच्या लढतीत पॅराग्वेचा ४-१ असा फडशा पाडलेल्या अमेरिकन संघाचे सहा गुण झाले, तर ऑस्ट्रेलियाचे तीन गुण कायम राहिले.

त्यांनी पहिल्या लढतीत तुर्किएला दोन गोलने पराभूत केले होते. पुढील फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला पॅराग्वेविरुद्ध जिंकावेच लागेल. अमेरिकेचा अखेरचा गटसाखळी सामना तुर्किएविरुद्ध होईल.

Loading content, please wait...

Related Stories

Gautam Gambhir and Shubman Gill planning Team India strategy for 2027
Hockey
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
FIFA Drops $20 Billion Investment Plan
Marathi News Esakal
www.esakal.com