Usman Khawaja: हे कसलं सेलीब्रेशन... उस्मान भाईने शतक ठोकल अन् बॅट... व्हिडिओ व्हायरल

Usman Khawaja Century
Usman Khawaja Centurysakal

Usman Khawaja Century : सलामीवीर उस्मान ख्वाजाने नाबाद शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पुनरागमन केले. अॅशेस मालिकेअंतर्गत एजबॅस्टन येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ख्वाजा आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी यांनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली, ज्यामुळे कांगारू संघाला 5 बाद 311 अशी मजल मारता आली.

पाहुणे ऑस्ट्रेलिया आता यजमान इंग्लंडच्या पहिल्या डावात केलेल्या 393 धावांच्या तुलनेत 82 धावांनी मागे आहे. यादरम्यान ख्वाजांच्या शतकाच्या सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली. डावखुरा फलंदाज ख्वाजाने शतक झळकावल्यानंतर बॅट हवेत फेकली.

Usman Khawaja Century
Eng vs Aus : ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर! ख्वाजा भाऊने ठोकले शामदार शतक

ख्वाजाने 199 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. शतक पूर्ण केल्यानंतर ख्वाजा मैदानावर सिंहाप्रमाणे गर्जना केली. एवढेच नाही तर त्याने हवेत उडी मारली आणि नंतर आनंदाने बॅट फेकली.

ख्वाजाच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चर्चेत आहे. ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे 15 वे शतक आहे. एका टोकाला ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडत असताना ख्वाजा दुसऱ्या टोकाला खंबीरपणे उभा राहिला.

Usman Khawaja Century
मिशन ODI World Cup 2023 सुरुवात! फायनलमध्ये एन्ट्री करण्यासाठी होणार टक्कर

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ख्वाजा 279 चेंडूत 126 धावा करून नाबाद परतला. अॅलेक्स कॅरी 80 चेंडूत 52 धावा करत ख्वाजासोबत खेळत आहे. ख्वाजाने ट्रॅव्हिस हेडसोबत चौथ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली, तर कॅमेरून ग्रीनसोबत पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ख्वाजाने कॅरीसोबत 91 धावा जोडल्या आहेत. 63 चेंडूत 50 धावा करून हेड बाद झाला तर ग्रीनने 68 चेंडूत 38 धावा केल्या.

Usman Khawaja Century
Indonesia Open 2023: बॅडमिंटनमधून आनंदाची बातमी! सात्विक अन् चिराग पोहचले इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या डावात अॅलेक्स कॅरीने 47 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद अर्धशतक झळकावून त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उस्मान ख्वाजाने 2023 साली दक्षिण आफ्रिका, भारत आणि आता इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावून आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असण्याचे उदाहरण सादर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com