esakal | Tokyo Olympics: जपानी मुलीवर बलात्कार; 30 वर्षीय तरूणाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo olympic

Tokyo Olympics: जपानी मुलीवर बलात्कार; 30 वर्षीय तरूणाला अटक

sakal_logo
By
विराज भागवत

ऑलिंपिक सुरू होण्याआधीच स्पर्धेला गालबोट

टोकियो : टोकियो येथे २०२० मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. आता सर्व सुरक्षिततांची काळजी घेऊन ही स्पर्धा पार पाडण्यात येणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्याआधीच स्पर्धेला गालबोट लागले. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन तसेच समारोप सोहळा होणाऱ्या स्टेडियममध्ये बलात्कार केल्याचा आरोप एका ३० वर्षीय उझबेकिस्तानी विद्यार्थ्यावर एका जपानी तरूणीने केला असून त्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. (Uzbekistan student arrested over alleged rape of Japanese Girl at Tokyo Olympic Main Stadium)

हेही वाचा: IND vs SL: इशान किशनने पहिल्याच सामन्यात केली धवनशी बरोबरी

बलात्कार झालेली जपानची युवती तसेच उझबेकिस्तानचा विद्यार्थी स्पर्धेतील मुख्य स्टेडियमवर काम करीत होते. उझबेकिस्तानचा दावरोनबेक रखमातुलाएव हा मुख्य स्टेडियममधील पत्रकारांना अन्नपदार्थ देण्याचे काम करीत होता. तरूण व तरूणी दोघेही या स्टेडियममध्ये पार्ट टाईम काम करत होते. याच दरम्यान समारोप समारंभाची तालीम बघण्यासाठी हे लोक थांबले असता या विद्यार्थ्याने तरूणीवर बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. तरूणी या विद्यार्थ्याला आधी भेटली नव्हती. त्याच दिवशी त्यांची ओळख झाली होती, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: 'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना पदार्पणाची संधी

दरम्यान, या युवकाने बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. ऑलिंपिक समारोप सोहळ्याची रंगीत तालीम शुक्रवारी रात्री झाली. त्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्यानंतर युवकास अटक केली. स्पर्धा काही दिवसांवर असताना मुख्य स्टेडियममध्ये हे घडले असल्याने वातावरण काहीसे गंभीर झाले आहे.

loading image