

Vaibhav Suryavanshi Creates Multiple World Records With Fastest Century Double Century and Record Breaking Sixes
sakal
दोहा : प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक, दीड शतक आणि शतक तसेच सर्वाधिक षटकार अशा एकापाठोपाठ एक विक्रमांचे इमले उभारणाऱ्या वैभव सूर्यवंशीने ५३ चेंडूत २०४ धावांचे तुफान सादर केले. त्यामुळे भारताने रायसिंग स्टार्स आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अमिराती संघाचा सात विकेटने सहज पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. मूळ भारतीय असलेल्या आणि आयपीएलही खेळलेल्या हरप्रीत सिंग भाटिया याने १३० धावा करूनही अमिराती संघ भारतासमोर ५० षटकांत आठ बाद २४९ धावा करू शकला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीची त्सुनामी आली.