Vasai Virar Mayor’s Marathon : वसई-विरार महापौर मॅरेथॉन १३ डिसेंबरला; आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा मिळवण्याचा निर्धार...

Vasai Virar Mayor's Marathon 2026 date and details: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसई-विरार महापौर मॅरेथॉन’च्या १३व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. यंदा ही मॅरेथॉन १३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
Virar Mayor's Marathon 2026 will be held on December 13

Virar Mayor's Marathon 2026 will be held on December 13 ( Photo : Vijay Bate) 

Updated on: 

Vasai Virar Mayor's Marathon 13th edition December 13: वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे (VVMC) आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसई-विरार महापौर मॅरेथॉन’च्या (VVMM) १३व्या पर्वाचा अँबेसेडर म्हणून आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता उंच उडीपटू सर्वेश कुशारे याची निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या देवळगावचा रहिवासी असलेल्या सर्वेशने २०२६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत २.३१ मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता, तर राष्ट्रकुल स्पर्धेत २.२५ मीटर उडीसह रौप्यपदक जिंकले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सर्वेशचा हा प्रवास वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Loading content, please wait...