Vidarbha Create History in Vijay Hazare Trophy
esakal
क्रीडा
Vijay Hazare Trophy : विदर्भच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार; 'या' तीन खेळाडूंनी सौराष्ट्राची जीरवली, विजय हजारे ट्रॉफी जिंकली
Vidarbha Create History in Vijay Hazare Trophy : विदर्भाच्या संघाने पहिल्यांदाच या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं असल्याने हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला. या तीन खेळाडूंनी विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजालवी.
Vidarbha win Vijay Hazare Trophy for the first time in history: विदर्भाच्या संघाने यंदा विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यांनी सौराष्ट्रचा ३८ धावांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या संघाने पहिल्यांदाच ( Vidarbha win Vijay Hazare Trophy ) या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं असल्याने हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला. या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करत सौराष्ट्र समोर ३१८ धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, सौराष्ट्राला २७९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
