esakal | टेन्शन फ्री झाल्यावर विराटने दिला पंत-हेटमायरला दिलासा (VIDEO)

बोलून बातमी शोधा

DC vs RCB
टेन्शन फ्री झाल्यावर विराटने दिला पंत-हेटमायरला दिलासा (VIDEO)
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्स () संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांच्या झुंझार खेळीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात एका धावेनं विजय मिळवला. रंगतदार सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर पंत आणि हेटमायर यांना आपल्या चेहऱ्यावरील निराशा लपवता आली नाही. हे दोन्ही लढवय्ये हताश झाल्याचे चित्र सामन्यानंतर पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स आणि शेवटचे षटक टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने या दोन्ही खेळाडूंच्या खेळीचे कौतुक करताना पाहायला मिळाले.

दिल्ली कॅपिटल्सचे पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेल्या पंतला कोहलीनं दिलेला दिलासा आक्रमक शैलीच्या कोहलीतील एक अनोख्या रुपाच दर्शन घडवणारा होता. भारतीय संघाकडून खेळताना ऋषभ पंत हा विराटच्या नेतृत्वाखाली खेळतो. आयपीएलच्या मैदानात प्रतिस्पर्धी असला तरी त्याने शेवटपर्यंत नेलेली गेम आणि प्रतिस्पर्ध्यांची वाढवलेली धाकधूकही कौतुकास्पद असल्याचेच विराटने पंतसह हेटमायरच्या खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. हेटमायर- पंत जोडीने शेवटच्या षटकात RCB चे टेन्शन वाढवले होते. दोघांमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्यामुळे विराट कोहलीही फिल्डिंग करतावेळी तणावात होता. मात्र सिराजने पंतला उत्तम चेंडू टाकत कोहलीला टेन्शन फ्री केले. त्यानंतर विराटने मोठ्या मनाने पंत आणि हेटमायरच्या खेळीच कौतुक केले.

सिराजने हेटमायर-पंतच्या इराद्यांना लावला सुरुंग

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद सिराजच्या हाती सोपवला. पंत आणि हेटमायर जोडी सेट झाली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी या धावा खूप नव्हत्या. पण मोक्याच्या क्षणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सिराजने हेटमायर-पंतचे मनसुबे उधळून लावले. सिराजने 6 चेंडूत 12 धावा खर्च केल्या. दिल्लीला 2 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मॅच फिनिश करण्यात असमर्थ ठरल्यानंतर पंत-हेटमायर जोडी हताश दिसली. कोहलीने या दोघांना दिलासा देण्याचे काम केले.