esakal | Video: टप्पात आला अन् कार्यक्रमच केला! पाहा 'पॉवरफुल' सिक्सर
sakal

बोलून बातमी शोधा

Video: टप्पात आला अन् कार्यक्रमच केला! पाहा 'पॉवरफुल' सिक्सर

Video: टप्पात आला अन् कार्यक्रमच केला! पाहा 'पॉवरफुल' सिक्सर

sakal_logo
By
विराज भागवत

चेंडू हवेत गेला अन् बघता बघता थेट मैदानाच्या बाहेरच निघून गेला

लंडन: इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जोस बटलरचे दमदार अधर्शतक (५९) आणि त्याला लिव्हिंगस्टोन (३८) व मोईन अलीने (३६) दिलेली साथ यांच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २०० धावांचा टप्पा गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला १५५ धावाच करता आल्या. इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे पाकचे फलंदाज फिके पडले. या सामन्यात चर्चा रंगली ती इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन याच्या उत्तुंग अशा षटकाराची... (Video Liam Livingstone hits 122 meter six vs Pakistan fans call it biggest ever)

हेही वाचा: Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO

लियाम लिव्हिंगस्टोन फलंदाजी करत होता. सोळाव्या षटकात त्याला अतिशय सोपा असा गुड लेंग्थ बॉल लांब मारायला मिळाला. हॅरिस रौफने त्याला अगदी पुढ्यात चेंडू टाकला. लिव्हिंगस्टोनने संधी न दवडता चेंडू जोर काढून फटकावला. चेंडू हवेत गेला आणि बघता बघता थेट मैदानाच्या बाहेरच निघून गेला. त्याने तब्बल १२२ मीटर लांब षटकार लगावला.

पाहा तो पॉवरफुल षटकार!

हेही वाचा: IND vs SL: इशान किशनने पहिल्याच सामन्यात केली धवनशी बरोबरी

चाहत्यांनी हा षटकार इतिहासातील सर्वात मोठा षटकार असल्याचं म्हणायला सुरूवात केली. पण काही चाहत्यांनी लगेचच हा सर्वात मोठ्या षटकारांपैकी एक आहे असं सांगितलं. याआधी २००५ साली ब्रेट ली याने विंडिजविरूद्ध तब्बल १४३ मीटर लांब षटकार मारला होता. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तब्बल १२७ मीटर मोठा षटकार लगावला होता.

loading image