esakal | Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO

दोन दिवसांपासून ऑलिम्पिक खेळाडूंसाठी देण्यात आलेल्या बेडवरून बराच गदारोळ झाला. बेड मजबूत नसल्याबाबत आणि ते अँटी सेक्स असल्याचा आरोप करण्यात आला.

Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO

sakal_logo
By
सूरज यादव

टोकियो - ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास फक्त चारच दिवस उरले आहेत. कोरोनाच्या संकटात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्यासाठी जपान सरकारने मोठी तयारी केली आहे. खेळाडूंच्या कोरोना टेस्टपासून ते त्यांच्या खाण्या, पिण्याचे आणि राहण्याची व्यवस्थाही चोख व्यवस्था करण्यात आलीय. मात्र, दोन दिवसांपासून ऑलिम्पिक खेळाडूंसाठी देण्यात आलेल्या बेडवरून बराच गदारोळ झाला. बेड मजबूत नसल्याबाबत आणि ते अँटी सेक्स असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी आयोजकांनी हलके बेड तयार केले आहेत आणि ते अँटि सेक्स असल्याचं काहींनी म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर आयओसीने खुलासा करत बेड मजबूत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आयओसीने एका अॅथलिटचा व्हिडिओ शेअऱ करताना बेड किती मजबूत आहे ते सांगितलं. अँटि सेक्स बेडबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर मॅक्लेनघन या जिम्नॅस्टने बेडवर उड्या मारल्या. त्याचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. हाच व्हिडिओ ऑलिम्पिक समितीने शेअर केला आहे. तसंच मॅक्लेनघनचं आभारही मानलं आहे. अँटि सेक्स बेड ही एक अफवा असल्याचं सिद्ध केल्याबद्दल आभार, कार्डबोर्डचे बेड हे मजबूत आहेत असं आयओसीने म्हटलं आहे.

हेही वाचा: ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कोरोनामुळे भंगलं; 17 वर्षीय टेनिस स्टारची माघार

न्यूयॉर्क पोस्टने अँटि सेक्स बेडबाबतचे वृत्त दिले होते. अमेरिकेचा धावपटू पॉलने केलेल्या ट्विटनंतर हे वृत्त प्रसारीत झाले होते. पॉलने बोर्ड मजबूत नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती. खेळाडूंना देण्यात आलेले बेड कार्डबोर्डचे आहेत. ते एकाच व्यक्तीचं वजन पेलू शकतात. दोन व्यक्ती झोपल्यास बेड मोडेल. त्यावर थोडं जास्त वजन झालं तरी तो तुटेल असा आरोप काही खेळाडूंनी केला होता.

हेही वाचा: India vs Sri Lanka: इशान किशनने उलगडलं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याचं रहस्य

ऑलिम्पिक स्पर्धेच्या कालावधीत सेक्सची चर्चाही नेहमीच होते. त्यासाठी कंडोमसुद्धा पुरवण्यात येतात. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कंडोम पुरवण्याची ही पद्धत जुनीच आहे. एचआयव्हीचा धोका टाळण्यासाठी हे केलं जातं. मात्र, यावेळी अँटी सेक्स बेड तयार केल्यानं पुन्हा आयओसी वादात अडकली आहे.

loading image