esakal | Video: विराटची तारेवरची कसरत.. स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Superb-Catch-In-Slip

Video: विराटची तारेवरची कसरत.. स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल

sakal_logo
By
विराज भागवत

ओव्हरटनच्या बॅटला लागून चेंडूने वेगाने उडाला अन्...

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला. त्यानंतर चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनेदेखील ५३ धावांच्या मोबदल्यात ३ गडी गमावले. इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूट बाद झाल्यामुळे त्याच्या जागी नाईट वॉचमन क्रेग ओव्हरटनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. त्याने पहिल्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत तग धरला. पण दुसऱ्या दिवशी सुरूवातीलाच तो झेलबाद झाला. विराटने त्याचा अफलातून झेल टिपला.

हेही वाचा: विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले

क्रेग ओव्हरटन ११ चेंडूत १ धावा करून खेळत होता. त्याला चेंडूच्या उसळीचा अंदाज आला नाही. चेंडू गूड लेंग्थवरून अचानक उडला. ओव्हरटनने धावा मिळवण्याच्या दृष्टीने बॅट फिरवली पण त्याला चेंडू फटकवता आला नाही. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये असलेल्या विराटच्या दिशेने गेला. चेंडू इतक्या वेगाने जात असताना विराट अतिशय चपळाईने झेल टिपला. विराट स्लिपमध्ये ज्या स्थितीत उभा होता त्या स्थितीतून पटकन उभं राहून झेल पकडणं अवघड होतं, पण विराटने तारेवरची कसरत करून झेल पकडला.

त्याआधी, पहिल्या दिवशी टॉस जिंकून जो रूटने भारताला फलंदाजी दिली. भारताचा डाव १९१ धावांत आटोपला. सलामीवीर रोहित शर्मा (११) आणि लोकेश राहुल (१२) झटपट बाद झाले. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा (४) आणि रविंद्र जाडेजाही (१०) माघारी परतले. अजिंक्य रहाणेलाही १४ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर, विराट कोहलीने मात्र झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याने ९६ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावा केल्या. विराट आणि पंत बाद झाल्यावर शार्दूल ठाकूरने फटकेबाजीला सुरूवात केली. त्याने उमेश यादवला हाताशी घेत ६३ धावांची भागीदारी केली. शार्दूलने ५७ धावा केल्या, पण शार्दूल बाद झाल्यावर भारताचा डाव १९१ धावांवर आटोपला.

loading image
go to top