esakal | IPL 2021: धोनीने हात दाखवताच चिमुरड्याने काय केलं पाहा (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

CSK-Dhoni-Small-Kid

IPL 2021: धोनीने हात दाखवताच चिमुरड्याने काय केलं पाहा (Video)

sakal_logo
By
विराज भागवत

CSKच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट केला व्हिडीओ

IPL 2021 in UAE: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. २००७ आणि २०११ चा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार म्हणून धोनीला मानणारी लोकंही भरपूर आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्याच्या चाहत्या वर्गात घट झालेली नाही. अजूनही धोनी दिसला की त्याच्या आणि CSK च्या नावाचा जयजयकार केला जातो. नुकताच धोनी IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी युएईमध्ये दाखल झाला. त्यावेळचा धोनी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2021 : प्रितीच्या पंजाबची झटपट अ‍ॅक्शन; मलानची जागा भरली

धोनी आपले सराव सत्र संपवून टीम बसकडे जात होता. त्यावेळी काही फॅन्स धोनीची वाट पाहत उभे असल्याचे दिसले. धोनीला पाहताच फॅन्स चीअर करायला लागले. धोनी-धोनी असं ओरडायला लागले. ते पाहून धोनीने त्यांना हात दाखवत अभिवादन केले. धोनीने हात दाखवला आणि तो पुढे चालू लागला. पण धोनीने हात दाखवल्यानंतर एक छोटा मुलगा जोरजोरात CSK, CSK असे ओरडू लागला. त्या मुलाने अक्षरश: CSKचा जयजयकारच केला. टाळ्या वाजवत त्याने CSK चं नाव घेतलं. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

हेही वाचा: IPL 2021 : गळती लागली! इंग्लंडच्या त्रिकूटाची स्पर्धेतून माघार

टीम इंडियातील 6 स्टार खेळाडूंवर BCCI ची नजर

टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडूही IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत. इंग्लंड दौऱ्यात कोरोनाची लागण झालेल्या सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात भारताचे काही खेळाडू आले होते. त्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज हे दिग्गज खेळाडू आहेत. योगेश परमार यांच्या संपर्कात होते. परमार हे पॉझिटिव्ह आल्याने आता या सहा खेळाडूंवर BCCI ची खास नजर आहे.

loading image
go to top