Vijay Hazare Trophy : कर्नाटक महाराष्ट्राशी फायनल खेळण्यापूर्वीच झाला गारद

Vijay Hazare Trophy Maharashtra Vs Saurashtra Final
Vijay Hazare Trophy Maharashtra Vs Saurashtra Finalesakal

Vijay Hazare Trophy Maharashtra Vs Saurashtra Final : विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज दोन सेमी फायनल सामने झाले. पहिल्या सेमी फायनल सामन्यात सौराष्ट्रने कर्नाटकचा 5 विकेट्सनी पराभव केला. तर दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात महाराष्ट्रने आसामचा 12 धावांनी पराभव केला. आता 2 डिसेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात होईल. पहिल्या सेमी फायनल सामन्याचा सामनावीर जयदेव उनाडकट तर दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला.

Vijay Hazare Trophy Maharashtra Vs Saurashtra Final
Ruturaj Gaikwad : आसामविरुद्ध देखील ऋतुराज बरसला! झंझावती शतक

पहिल्या सेमी फायनल सामन्यात कर्नाटकने सौराष्ट्रासमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्नाटककडून सलामीवीर समर्थने सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवाल 1 तर मनिष पांडे भोपळाही न फोडता माघारी परतला सौराष्ट्रकडून जयदेव उनाटकटने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

कर्नाटकचे 172 धावांचे आव्हान पार करताना सौराष्ट्रने 5 विकेट्स गमावल्या. जय गोहीलने सर्वाधिक 61 धावा केल्या. त्याला समर्थ व्यासने 33 आणि प्रेरक मंकडने 35 धावा करून चांगली साथ दिली.

Vijay Hazare Trophy Maharashtra Vs Saurashtra Final
Rishabh Pant VIDEO : पंत सेहवागवरील प्रश्नावर भडकला; हर्षा भोगलेंना म्हणतो, सर 'हा' तर...

दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने 50 षटकात 7 बाद 350 धावा केल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद 168 धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. त्याला बच्छावने 41 धावा करून चागली साथ दिली. गायकवाडनंतर अंकित बावनेने देखील 110 धावांची शतकी खेळी केली.

महाराष्ट्राच्या या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आसामने देखील 338 धावांपर्यंत मजल मारली. आसामकडून स्वरूपमने 95 धावांची तर सिबसंकर रॉयने 78 धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून राजवर्धन 65 धावात 4 विकेट्स घेत महाराष्ट्राच्या विजयात मोठे योगदान दिले.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com