Vijay Hazare Trophy Sai Sudharsan N Jagadeesan
Vijay Hazare Trophy Sai Sudharsan N Jagadeesan ESAKAL

Vijay Hazare Trophy : तमिळनाडूच्या सलामी जोडीने चोपल्या 416 धावा; दिग्गज गेल - सॅम्युअल्सचे मोडले रेकॉर्ड

Vijay Hazare Trophy Sai Sudharsan N Jagadeesan : तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफीत अरूणाचल प्रदेशविरूद्ध 50 षटकात 2 बाद 506 धावा ठोकून विक्रम रचला. तमिळनाडूची सलामी जोडी साई सुदर्शन आणि एन. जगदीशन यांनी धडाकेबाज फलंदाजी करत अरूणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या दोघांनी 38.3 षटकात 416 धावांची विश्वविक्रमी सलामी देत संघाच्या अवाढव्य धावसंख्यात सिंहाचा वाटा उचलला. जगदीशनने 277 धावा तर सुदर्शनने 154 धावांची खेळी केली.

Vijay Hazare Trophy Sai Sudharsan N Jagadeesan
Suryakumar Yadav : तिसऱ्या T20 सामन्यात सूर्याच्या रडारवर आता रिझवान, बाबरला आधीच टाकलंय मागं

विशेष म्हणजे या दोघांनी लिस्ट A क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला. तमिळनाडूच्या या सलामी जोडीने वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि सॅम्युअल्सचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले. या दोघांनी 372 धावांची सलामी दिली होती. आता लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात मोठी सलामी देणाऱ्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. या यादीत संजू सॅमसन आणि सचिन बेबी हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 338 धावांची सलामी दिली होती.

नारायण जगदीशनने अरूणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याने 277 धावांची द्विशतकी खेळी करत संघाच्या जवळपास निम्म्या पेक्षा जास्त धावा एकट्यानेच कुटल्या. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार मारले. साई सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात 19 चौकार आणि 2 षटकार मारले.

Vijay Hazare Trophy Sai Sudharsan N Jagadeesan
Vijay Hazare Trophy : हद्दच झाली! 50 षटकात 506 धावा ठोकून 'या' संघाने इतिहास रचला

जगदीशनने याच सामन्यात श्रीलंकेचे महान सलामीवीर कुमार संगकाराला देखील मागे टाकले. त्याने लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. लिस्ट A मध्ये वेगवेगळ्या देशात ल देशांतर्गत वनडे स्पर्धा ज्यात 40 ते 60 संघांनी भाग घेतलेला असतो अशा स्पर्धांचा समावेश असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com