World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपच्या बाहेर; मयांक अगरवाल खेळणार?

वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

भारताचा अष्टपैलू विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळे तो विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर मयांक अगरवालला संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप 2019 : भारताचा अष्टपैलू विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळे तो विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर मयांक अगरवालला संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नाही. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. 

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला अंतिम संघात स्थान मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shankar out of Cricket world cup due to injury Mayank Agarwal likely to replace him