१५ पानांची नोटीस अन् गंभीर आरोप; ऑलिंपिकवीर विनेश फोगाटला कुस्ती महासंघाने का ठरवलं अपात्र?

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिंपिकनंतर पुनरागमनाच्या तयारीत असलेल्या विनेश फोगाटला भारतीय कुस्ती महासंघाने मोठा धक्का दिला आहे. शिस्तभंग, वजन मर्यादा आणि डोपिंग नियम उल्लंघनाच्या आरोपांमुळे तिला २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अडचणीत सापडलेली कुस्तीपटू विनेश फोगाट पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहे, परंतु भारतीय कुस्ती महासंघाने तिची कायद्याच्या चौकटीत बसवून कोंडी केली आहे. २६ जून २०२६ पर्यंत विनेशला देशांतर्गत कोणत्याही स्पर्धांत सहभागी होण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com