esakal | "कोण होता तो क्रिकेटर.. त्याला माझ्यासमोर आणा"; गावसकर संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-Gavaskar

"कोण होता तो क्रिकेटर.. त्याला माझ्यासमोर आणा"; गावसकर संतापले

sakal_logo
By
विराज भागवत

भारत-इंग्लंड कसोटीचा वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय

Ind vs Eng 5th Test Cancelled: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा सामना कोरोनाच्या भीतीपोटी रद्द झाला. भारताचे मुख्य कोच रवी शास्त्री यांना चौथ्या कसोटी दरम्यान तर ज्युनियर फिजीओ योगेश परमार यांना पाचव्या कसोटीआधी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पाचवा सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. भारतीय क्रिकेटपटूंनी सामना खेळण्यास नकार दिला अशी माहिती ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिली. तसेच, IPL च्या दृष्टीने मुद्दाम हा सामना रद्द करण्यात आल्याचे आरोपही त्यांनी टीम इंडियावर केले. यावर, लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा: "इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तेव्हा काय केलं होतं विसरू नका"

भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न याच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेले होते. त्यानंतरच कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली असा दावा इंग्लिश माध्यमांनी केला. त्यावर बोलताना गावसकर म्हणाले, "कशावरून त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातूनच कोरोनाचा फैलाव झाला? त्या प्रकाशन सोहळ्यानंतर टीम इंडियाची टेस्ट घेण्यात आली होती. सारे जण कोरोना निगेटिव्ह होते. अशा परिस्थितीत इंग्लिश प्रसारमाध्यमे दावा करतात की भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला. कोण होता तो खेळाडू... त्याला माझ्यासमोर हजर करा... पण जो पर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल नीट माहिती नाही तोपर्यंत असं काही बोलू नका. इंग्लिश माध्यमे कधीच भारतीय संघाबद्दल चांगलं बोलणार नाहीत. पण अशा बाबतीत आधी तपास करा आणि पुराव्यानिशी आरोप करा", अशा शब्दात गावसकरांनी त्यांना सुनावलं.

IND vs ENG

IND vs ENG

हेही वाचा: IND vs ENG: वाद शमेना... इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं ICCला पत्र

"भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २-१ने मालिकेत आघाडी घेतली होती. मँचेस्टरच्या पिचवरदेखील भारतीय गोलंदाजांना मदत मिळाली असती. असे असताना ते खेळायला नकार का देतील? उलट त्यांना खेळून मालिका ३-१ने जिंकण्याची संधी होती. त्यामुळे भारताच्या खेळाडूंनी सामन्याला नकार दिला हे मला मान्यच नाही. जर इंग्लिश माध्यमांचा दावा खरा असेल, तर BCCI ने अधिकृत सांगावं की आमचे खेळाडू खेळू शकत नव्हते. पण जर तसं नसेल तर इंग्लिश माध्यमांनी पुराव्याशिवाय आरोप करू नयेत", असे ते म्हणाले.

loading image
go to top