INDvsWI : विराटला काहीही करुन हे शतक हवे होते कारण...

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक झळकाविले. या सामन्यानंतर बोलताना भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कोहलीला काहीही करुन या सामन्यात शतक हवे होते असे सांगितले. 

गयाना : भारताचा कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक झळकाविले. या सामन्यानंतर बोलताना भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कोहलीला काहीही करुन या सामन्यात शतक हवे होते असे सांगितले. 

कालच्या सामन्यातील शतकासह कोहलीने सलग 11 डावांनंतर शतकाची प्रतिक्षा संपवली. सामन्यानंतर बोलाना भुवी म्हणाला, ''कोहलीला काहीही हे शतक हवे होते. तो फॉर्मात नव्हता म्हणून नव्हे तर गेल्या अनेक डावांमध्ये तो 70 किंवा 80 धावा करुन बाद होत होता. तो नेहमी मोठ्या खेळींसाठी ओळखला जातो. सामन्याची खेळपट्टी खूप चांगली नव्हती मात्र, कोहली किती चांगला खेळाडू आहे हे सर्वांना माहित आहे.'' 

विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. कोहलीने १२५ चेंडूत १२० धावा केल्या तर भुवीने 31 धावा गेत 4 विकेट घेतल्या. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat badly wanted a hundred says Bhuvneshwar Kumar