Stuart Broad : विराटची अनुपस्थिती; इंग्लंडला जिंकण्याची संधी - स्टुअर्ट ब्रॉड

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे ही मालिका जिंकण्याची इंग्लंडला चांगली संधी आहे, असे मत इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने व्यक्त केले आहे.
 virat kohli absence great chance for england to win test cricket series stuart broad
virat kohli absence great chance for england to win test cricket series stuart broadSakal

केप टाऊन : भारत आणि इंग्लंड या तुल्यबळ संघातील कसोटी मालिका कमालीची चुरशीची होत आहे. १-१ अशा बरोबरीमुळे तर रंगत आणि उत्सुकता अधिकच वाढलेली आहे, परंतु तडफदार खेळ करण्याची क्षमता असलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे ही मालिका जिंकण्याची इंग्लंडला चांगली संधी आहे, असे मत इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने व्यक्त केले आहे.

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगसाठी ब्रॉड समालोचक होता. ही लीग संपल्यानंतर त्याने सध्या रंगतदार अवस्थेत असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत भाष्य केले. विक्रमवीर विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे आता पूर्ण मालिकेतून बाहेर गेला आहे. मालिकेची स्थिती १-१ अशी असून तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होत आहे.

दोन्ही कसोटी सामने चुरशीचे झाले. माझ्या मते आतापर्यंतच्या भारत-इंग्लंड मालिकेतील हे सर्वांत रोमांचकारी सामने होते. दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला असला, तरी बॅझबॉल स्टाईलचा खेळ भारतात प्रभावी ठरतोय हे स्पष्ट होत आहे.

आता विराट कोहली पुढचेही तीन सामने खेळणार नससल्यामुळे ही मालिका जिंकण्याची इंग्लंडला नामी संधी असेल, असे ब्रॉड म्हणाला. विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांच्यातील द्वंद नेहमीच कमालीचे रंगतदार ठरलेले आहे,

परंतु पाच सामन्यांच्या मालिकेत या दोन महान खेळाडूंमधील लढत पाहायला मिळणार नाही याचा खेद प्रेक्षकांना निश्चितच असेल. विराट मैदानात असतो तेव्हा तो वेगळी ऊर्जा, स्पर्धा आणि पॅशन निर्माण करत असतो. अशा वेळी प्रतिस्पर्धी संघही तेवढ्याच तडफेने खेळत असतो, परंतु क्रिकेटपेक्षा वैयक्तिक कारणे महत्त्वाची असतात असे ब्रॉडने सांगितले.

एक पाऊल पुढे...

ट्वेन्टी-२० क्रिकेटचे प्राबल्य असतानाही अँडरसन आणि ब्रॉड यांनी अनेक कसोटी सामने गाजवले. या दोघांनी मिळून १२०० पेक्षा अधिक कसोटी विकेट मिळवल्या आहेत. सध्याच्या युगात सातत्याने आणि प्रदीर्घ काळ खेळणारी अशी वेगवान गोलंदाजांची जोडी मिळणे कठीण आहे.

माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांची आमची अशी जोडी कदाचित अखेरची जोडी असेल. बुमरा हा फारच प्रभावशाली कसोटी गोलंदाज आहे, परंतु जोडी म्हणून आम्ही एक पाऊल पुढे आहोत, असे ब्रॉड म्हणतो.

अँडरसनचे कौतुक

ब्रॉडचा नव्या चेंडूवरील माजी साथीदार जेम्स अँडरसनचे त्याने कौतुक केले. वयाच्या ४१ व्या वर्षातही त्याची उमेद कायम आहे. खेळपट्टी कशीही असली, तरी अँडरसन तेवढ्याच जोशात मारा करत आहे, असे तो म्हणाला.

...म्हणून वेगवान गोलंदाज प्रभावी

एरवी भारतातील कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांचे पहिल्या दिवसापासून वर्चस्व अपेक्षित असते, परंतु दोन्ही कसोटीत वेगवान गोलंदाजांनी प्रभाव पाडला. जसप्रीत बुमरा तर भारताच्या विजयाचा हिरो ठरला. सकाळी पडणाऱ्या दवाचा खेळपट्टीवर परिणाम होत असावा आणि त्यामुळे वेगवान गोलंजांना प्रभावी ठरत असावे, असे ब्रॉडचे म्हणणे आहे.

कसोटीचा कार्यक्रम ठरवा

सध्या कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. एकाच वेळी सर्वांनी कसोटी सामने खेळण्याचा कालावधी तयार करायला हवा. कसोटी क्रिकेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, परंतु वर्ल्ड कपच्या स्पर्धा आणि अनेक टी-२० लीग यामुळे एकाच वेळी सर्वांसाठी कसोटी क्रिकेटचा कार्यक्रम तयार करणे कठीण आहे, असे ब्रॉड म्हणतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com