Virat Kohli
Virat Kohliesakal

टीम इंडियाला धक्का! Virat Kohli इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह

शेवटच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का
Published on

भारत आणि इंग्लंड बर्मिंगहॅम येथे होणार्‍या एकमेव कसोटीत होणार आहे. याआधी टीम इंडिया 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूही लेस्टरला पोहोचले आहेत, मात्र या सामन्याआधी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती आहे.(Virat Kohli Among India Test Stars Hit by Covid After Landing in England Tour)

Virat Kohli
टीम इंडियाला मोठा झटका!,R. Ashwin कोरोना पॉझिटिव्ह

याआधी भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. यामुळे कोविड१९ पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनूसार मालदीवमधून सुट्टी घालवून परतल्यानंतर विराटला कोरोनाची लागण झाली आहे. मालदीवमधून परतल्यानंतर कोहली थेट हॉस्पिटलमध्ये गेला होता. अलीकडेच लीसेस्टरला पोहोचल्यानंतर कोहली काही चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com