विराट-शास्त्रींची जोडी तोडायची नाय..; बीसीसीआयचीच पाठराखण

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनाचा कार्यकाळ संपल्याने आता बीसीसीआयकडून नवी न प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार का नवी न कोण येणार याबाबत उस्तुकता आहे. मात्र, बीसीसीआयचाच विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची जोडी फोडण्यास विरोध आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनाचा कार्यकाळ संपल्याने आता बीसीसीआयकडून नवी न प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार का नवी न कोण येणार याबाबत उस्तुकता आहे. मात्र, बीसीसीआयचाच विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची जोडी फोडण्यास विरोध आहे. 

प्रशासकिय समितीने भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजीचे प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 

"कोहली आणि शास्त्री यांची जोडी 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडकापर्यंत कायम ठेवावी. कोणत्याच पदावर कोणीही कायमस्वरुपी राहू शकत नाही. मात्र, कोहली आणि शास्त्री एकमेकांना चांगले ओळखतात आणि त्यामुळेच त्यांच्यातील समन्वयही चांगली आहे. त्यामुळे ही जोडी तोडणं चुकीचे ठरेल,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli and Ravi Shastri pair should not be separated thinks BCCI