
विराट-कुंबळे वादाला भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा संदर्भ
विराट कोहली (Virat Kohli) नुकताच सर्व संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. मात्र तो ज्यावेळी कॅप्टन्सीच्या भरात होता त्यावेळी भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेला (Anil Kumble) देखील आपले पद सोडावे लागले होते. त्यावेळी हे प्रकरण बरचे गाजले होते. आता विराट कोहली पायउतार झाल्यानंतर या जुन्या कढीला नव्याने उत आला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मॅनेजर रत्नाकर शेट्टी (Ratnakar Shetty) यांनी पडद्याआडच्या काही गोष्टी समोर आणल्या आहेत. (Virat Kohli Anil Kumble Dispute Ratnakar Shetty Reveal What Happened during Champions Trophy before India vs Pakistan Final)
हेही वाचा: IND vs WI: विराट-रोहित विक्रमाच्या उंबरठ्यावर; सचिन-सौरव जोडीच्या पक्तींत बसण्याची संधी
रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले की, काही लोकांना अनिल कुंबळेला प्रशिक्षक (Former Indian Team Coach Anil Kumble) म्हणून दुसरी टर्म मिळावी असे वाटत नव्हते. शेट्टी पुढे म्हणाले की विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद होते. मात्र या प्रकरणात कर्णधार वरचढ ठरला. शेट्टींनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अनिल कुंबळेला दुसरी टर्म मिळू नये अशी इच्छा काही लोकांची होती. कर्णधार आणि प्रशिक्षकांची भट्टीच जमली नव्हती. परिस्थिती कॅप्टनच्या बाजूने होती.'
हेही वाचा: इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही राजीनाम्याचा संसर्ग; लँगरनी सोडले पद
रत्नाकर शेट्टींनी सांगितले की 'इंग्लंडमधील 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी भारत - पाकिस्तान फायनलआधी एक बैठक झाली होती. विराट कोहली त्यावेळी अनिल कुंबळे खेळाडूंसाठी उभा रहात नाही यावरून नाखूख होता. विराटला वाटत होते की अनिल कुंबळे ड्रेसिंगरूममध्ये तणावाचे वातावरण तयार करत होता.'
अनिल कुंबळेच्या एक्झिटनंतर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. रवी शास्त्री 4 वर्षे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. 2021 च्या टी 20 वर्ल्डकपनंतर त्यांचा कार्यकाळ संपला. आता राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचा कर्णधार आहे.
Web Title: Virat Kohli Anil Kumble Dispute Ratnakar Shetty Reveal What Happened During Champions Trophy Before India Vs Pakistan Final
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..