Virat Kohli-Anushka Sharma Second Child : दुसऱ्यांदा होणार बाबा... एबीने सांगितलं विराटच्या माघारीचं कारण?

Virat Kohli-Anushka Sharma Second Child : एबी डिव्हिलियर्सने हिंट दिली मात्र खात्रीलायक माहिती तर विराट कोहली अन् अनुष्काचे देऊ शकतील.
Virat Kohli-Anushka Sharma Second Child
Virat Kohli-Anushka Sharma Second Child

Virat Kohli-Anushka Sharma Second Child : विराट कोहलीने ऐनवेळी इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. तो पहिल्या दोन कोसटीतून माघार घेतली होती. तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत साशंकता आहे. बीसीसीआयने देखील अजून काही स्पष्ट केलेले नाही.

विराटने ही माघार कौटुंबिक कराणाने घेतली आहे. मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे हे समजू शकलं नाही. याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. आता विराटचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनल विराटच्या अनुपस्थितीतबाबत एक वेगळा दावा केला.

Virat Kohli-Anushka Sharma Second Child
Davis Cup 2024 IND vs PAK : भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, डेव्हिस कपमध्ये 2 - 0 अशी घेतली आघाडी

एबी डिव्हिलियर्सने शनिवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आला होता. त्यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना विराट कोहलीबद्दल अपडेट दिली. त्याने सांगितले की त्याने विराट कोहलीला कॉल केला होता. त्याची चौकशी केली होती. त्यावेळी विराटने सांगितले की तो त्याच्या कुटुंबासोबत आहे.

डिव्हिलियर्स पुढे म्हणला की, 'त्यांचं दुसरं बाळ येणार आहे. या कराणामुळेच तो कुटुंबासोबत आहे.' डिव्हिलियर्सने ही माहिती देताच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील अशी शक्यता बोलून दाखवण्यात आली होती. सध्या एबी डिव्हिलियर्सकडून ही माहिती मिळत आहे. मात्र याची खात्रीलायक माहिती ही विराट अन् अनुष्काकडूनच मिळू शकते.

Virat Kohli-Anushka Sharma Second Child
IND vs ENG : यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा विकेट्सचा षटकार; दुसऱ्या दिवशीच भारताची सामन्यावर पकड

विराट कोहली आणि अनुष्का हे दोघं 2021 मध्ये आई - बाबा झाले होते. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. या दोन स्टार जोडप्यानं तिचं नाव वामिका असं ठेवलं होतं.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com