Virat Kohli Shubman Gill : हमारी भाभी कैसी हो... विराटनं प्रेक्षकांना दिला सल्ला अन् गिलची झाली गोची

Virat Kohli Shubman Gill
Virat Kohli Shubman Gillesakal

Virat Kohli Shubman Gill : भारतीय क्रिकेटमधील प्रिन्स शुभमन गिलने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 92 धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. शुभमन गिलचे शतक हुकल्यामुळे संपूर्ण स्टेडियमव हळहळले होते. यादरम्यान कॅमेरामनने सारा तेंडुलकरची रिअॅक्शन आपल्या कॅमेऱ्यात कैद केली अन् सोशल मीडियावर सारा तेंडुलकरच ट्रेंड करू लागली.

Virat Kohli Shubman Gill
World Cup 2023 Semi Final : भारताने सेमी फायनल गाठताच हॉटेल रूमचे एका रात्रीचे भाडे पोहचले 25,000 पार

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचे सामने पाहण्यासाठी सारा तेंडुलकर हमखास मैदनावर उपस्थिती लावत आहे. वानखेडे स्टेडियमवर देखील सारा तेंडुलकर उपस्थित होती. स्टेडियमवरील चाहते देखील तिच्या नावाच्या घोषणा देत होते. यावेळी किंग कोहलीने चाहत्यांना सारा तेंडुलकरच्या घोषणा देण्याऐवजी शुभमन गिलच्या नावाच्या घोषणा देण्याचा सल्ला दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल हे दोघे स्लीपमध्ये फिल्डिंग करत होते. त्यावेळी वानखेडे स्टेडियमवरील काही चाहत्यांनी हमारी भाभी कैसी हो सारा भाभी जैसी हो अशी घोषणा देण्यास सुरूवात केली. यावर विराट कोहलीने हावभाव करत शुभमन गिलच्या नावाची घोषणा देण्यास सांगितले.

Virat Kohli Shubman Gill
World Cup 2023 Semi Final : भारताने सेमी फायनल गाठताच हॉटेल रूमचे एका रात्रीचे भाडे पोहचले 25,000 पार

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 8 बाद 357 धावा करत लंकेसमोर मोठे आव्हान ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 88 धावांची खेळी केली. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने 82 धावांचे योगदान दिले.

भारताचे 357 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकाचा डाव 55 धावात संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शामीने भेदक मारा करत 5 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com