Happy Birthday Virat Kohli : 'द रन मशीन'चे कारकिर्दीतील काही खास शॉट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Batting

Happy Birthday Virat Kohli : 'द रन मशीन'चे कारकिर्दीतील काही खास शॉट्स

क्रिकेटच्या जगतातील सर्वांत महान भारतीय खेळाडू जरी सचिन तेंडूलकर असला तरी त्याच्या पाठोपाठ सध्याच्या भारतीय संघातील विराटचा नंबर लागतो. 'द रन मशीन' म्हणूनही त्याला ओळखलं जातं. जगातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. तर या विराट - द रन मशीनचा आज वाढदिवस. बघता बघता विराट ३४ वर्षाचा झालाय.

(Virat Kohli Birthday Special Video)

सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडून असून त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. तर त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आता सोडली आहे. मधल्या काही वर्षात शांत झालेली विराटची बॅट आता पुन्हा तळपताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या t20 विश्वचषकात त्याने चार सामन्यात तीन अर्धशतक केले आहेत. त्यामुळे तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

विराटने वयाच्या पस्तीसाव्या वर्षात पदार्पण केलं असून त्यानिमित्ताने त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तो जेवढा आक्रमक आहे तेवढाच तो त्याच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी सतर्क आहे.