World Cup 2019 :  भारताला दणका; कोहलीवर येऊ शकते बंदी

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत विश्वकरंडका्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, या सामन्यात पंचांशी हुज्जत घातल्याने त्याला बंदीची शिक्षा होऊ शकते. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत विश्वकरंडका्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, या सामन्यात पंचांशी हुज्जत घातल्याने त्याला बंदीची शिक्षा होऊ शकते. 

12 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार पायचीत असल्याचे अपील करण्यात आले. मात्र, मैदानावरील पंच मॅरिअर इरास्मस यांनी भारतीयांचं हे अपील फेटाळून लावलं. कोहलीने त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनीसुद्धा त्याला नाबाद घोषित केल्यावर मात्र, कोहलीने पंच मॅरिअस इरास्मस यांच्याशी हुज्जत घातली.

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यताही कोहलीने जास्तवेळी अपिल केल्याने त्याच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्यात आली होती. आयसीसीच्या नियमावलीनुसार  Article 2.1 Subsection of Level 1 या नियमाचा भंग केल्यास नकारात्मक गुण दिले जातात. जर दोन वर्षांच्या कालावधीत एका खेळाडूने 4 किंवा त्यापेक्षा जास्त नकारात्मक गुण कमावले तर त्याच्यावर आयसीसीच्या नियमांप्रमाणे बंदीची कारवाई करण्यात येते. बंदीची शिक्षा ही 1 कसोटी सामना किंवा 2 एकदिवसीय किंवा 2 ट्वेंटी20 सामन्यांसाठी दिली जाऊ शकते.

त्यामुळेच आता श्रीलंकेविरुद्ध त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा झाली तर त्याच्यावर बंदी येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli can get banned for violating code of conduct