Virat Kohli : पुजाराच्या शतकावर विराटने '56 इंच की छाती' काढून केले सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century

Virat Kohli : पुजाराच्या शतकावर विराटने '56 इंच की छाती' काढून केले सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल

Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century : भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने जानेवारी 2019 नंतर पहिल्यांदाच शतकी मजल मारली. भारताने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. भारताकडून शुभमन गिल (110) आणि चेतेश्वर पुजारा (102) यांनी शतकी मजल मारली.

चेतेश्वर पुजाराचे हे शतक दोन गोष्टींनी खास होते. हे त्याचे कसोटीमधील सर्वात वेगवान शतक होते. त्याने 130 चेंडूत शतक पूर्ण केले. याचबरोबर तब्बल 4 वर्षानंतर पुजाराने शतकी मजल मारली होती. ज्यावेळी पुजाराचे शतक पूर्ण झाले त्यावेळी त्याच्याबरोबर विराट कोहली देखील फलंदाजी करत होता. यावेळी विराट कोहलीने देखील पुजाराचे शतक जोरदार सेलिब्रेट केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: DRS Technical Glitch : DRS थकलं! यजमानांना आधी बेल्सने नंतर DRS ने दिला दगा, गिल थोडक्यात वाचला

दरम्यान, चेतेश्वर पुजाराच्या आधी 152 चेंडूत 110 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या शुभमन गिलने देखील आपल्या पहिल्या वहिल्या कसोटी शतकाबद्दल दिवस संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मला वाटते की खूप वाट पाहिल्यानंतर माझे शतक झाले आहे. आज कठिण काळातून बाहेर येणाचा दिवस होता. मी ज्यावेळी 90 धावा पार केल्या त्यावेळी मी वेगळा असा कोणताच विचार करत नव्हतो. मी फिल्डिंगप्रमाणेच खेळत होतो. दोन चौकार मारून शतक ठोकणे हे ठरवून केले नव्हते तर ते सहजच झाले. ज्यावेळी गोलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता त्यावेळी थर्ड मॅन आणि पॉईंटमध्ये गॅप निर्माण झाला होता.'

हेही वाचा: Cheteshwar Pujara : म्हातारा समजू नका! गिल पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखत ठोकलंय शतक

गिल पुढे म्हणाला की, 'मी फिल्डिंग वर घेतल्यानंतरच स्टेप आऊट होऊन फिल्डरच्या वरून फटका मारला. त्यापूर्वी मी असं केलं नव्हतं. ज्यावेळी मी लंच झाला त्यावेळी मी 13 धावांवर खेळत होतो. त्यानंतर मी 100 चेंडूत 70 धावा केल्या. मी धावांची गती वाढवत होतो. तुम्हाला माहिती पाहिजे की कधी आक्रमक फटका मारायचा आणि कधी नाही. हे शतक माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी खूप म्हत्वाचं आहे. पहिलं शतक हे प्रत्येक खेळाडूसाठी खासच असतं.'

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये