धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

दोन दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूरवी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याबाबत खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूरवी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याबाबत खुलासा केला आहे. 

U19 Asia Cup : केवळ 106 धावा करुनही भारताने जिंकली फायनल!

''माझ्या मनात लांब लांबपर्यंत हा विचारही नव्हता. धोनी निवृत्ती घेतोय हा विचारही मी केला नव्हता. मी घरात बसलो होते आणि मला फक्त त्या सामन्याची आठवण आली त्यामुळे मी सहज फोटो शेअर केला. मात्र, लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ लावला,'' असे स्पष्टीकरण त्याने दिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

For everyone who were asking about the MS Dhoni-VK picture on the Skip's Insta feed #TeamIndia

A post shared by Team India (@indiancricketteam) on

2016मध्ये झालेल्या ट्वेंटी20 विश्वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीचा आणि त्याचा फोटो कोहलीने शेअर केला होता. या सामन्यात धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. त्यामुळे कोहलीची पुरती दमछाक झाली होती. त्यामुळेच सामन्यानंतर कोहलीनं खेळपट्टीवर गुडघे टेकले.

INDvsSA : हा सलामीवीर खोऱ्यानं धावा करतोय तरी रोहितलाच संधी का?

याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं शेअर केला होता. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.'' कोहलीच्या या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीचा चर्चांना वेग आला होता. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तो निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A game I can never forget. Special night. This man, made me run like in a fitness test @mahi7781 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Clarifies His Tweet On MS Dhoni