Virat Kohli : 71 शतके! विराटची सचिन तेंडुलकरवर निसटती आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli 71st International Century Sachin Tendulkar

Virat Kohli : 71 शतके! विराटची सचिन तेंडुलकरवर निसटती आघाडी

Virat Kohli 71st International Century : भारताचा रन मशिन विराट कोहलीच्या बॅटमधून अखेर 1021 दिवसांनंतर शकत आले. त्याचे जवळपास साडेतीन वर्षे रखडलेले 71 शतक अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 सामन्यात आले. आशिया कपमधील भारताच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची तुफानी खेळी केली. ही खेळी त्याने 12 चौकार आणि 6 षटकारांनी सजवली. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय टी 20 मधील पहिलेच शतक होते. विराट कोहलीने या शतकाबरोबर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत रिकी पॉटिंगशी बरोबरी केली. विराट कोहलीच्या पुढे आता सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) शतकांच्या शतकाचा विक्रम आहे.

हेही वाचा: Virat Kohli : विराट रोहितला म्हणतो, तू जी स्पेस मला दिलीस त्यामुळे...

सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड फक्त विराट कोहली मोडू शकतो हे खुद्द क्रिकेटच्या देवाने म्हणजे सतिन तेंडुलकरने सांगितले होते. विराटचा हा प्रवास गेली तीन वर्षे 70 शतकांवर रखडला होता. अखेर त्याने आपल्या 522 व्या डावत 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकत आपल्या शतकांच्या शतकाकडील प्रवासाला वेग दिला. जर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याच्या प्रवासाची तुलना केली तर या तुलनेत विराट कोहली किंचीतसा आघाडीवर असल्याचे दिसते.

हेही वाचा: SL vs PAK : लंकेने कर्णधाराला दिले बर्थडे गिफ्ट! पाकवर पाच विकेट्सनी मिळवला विजय

सचिन तेंडुलकरने आपले आंतरराष्ट्रीय 71 वे शतक ठोकण्यासाठी 523 डाव घेतले होते. तर विराट कोहलीने ही कामगिरी 522 म्हणजे अवघ्या 1 डाव आधी पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत देखील विराट कोहली थोडा आघाडीवर आहे. सचिनच्या 71 व्या शतकावेळी 23 हजार 274 धावा झाल्या होत्या तर विराट कोहलीच्या 24 हजार 002 धावा झाल्या आहेत. विराटची सरासरी 53.81 इतकी आहे तर सचिनची 71 व्या शतकावेळी सरासरी 49.51 इतकी होती. आंतरराष्ट्रीय अर्धशतकांच्या बाबतीतही विराट कोहली सचिनच्या पुढे आहे. विराट कोहलीने 124 अर्धशतके ठोकली आहेत. तर त्यावेळी सचिन तेंडुलकरची 107 अर्धशतके झाली होती.

Web Title: Virat Kohli Complete 71st International Century 1 Inning Sooner Than Sachin Tendulkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..