विराटची पहिली प्रतिक्रिया 'लीडर होण्यासाठी कर्णधारपद गरजेचे नाही' | Virat Kohli First Statement After Stepping Down as Test Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli First Statement After Stepping Down as Test Captain
विराटची पहिली प्रतिक्रिया 'लीडर होण्यासाठी कर्णधारपद गरजेचे नाही'

विराटची पहिली प्रतिक्रिया 'लीडर होण्यासाठी कर्णधारपद गरजेचे नाही'

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी २० पाठोपाठ कसोटी संघाचे नेतृत्व देखील सोडले. त्याने नेतृत्व सोडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कारण कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याच्या नेतृत्वात भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले होते. तो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होता. विराट कोहलीने नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केल्यापासून क्रिकेट (Cricket) वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. विराटने असे अचानक कसोटी संघाचे नेतृत्व कसे काय सोडले असा सर्वांचा सूर होता. (Virat Kohli First Statement After Stepping Down as Test Captain)

हेही वाचा: Pillow Fighting मध्ये तरबेज असाल तर मिळेल साडे तीन लाखांच बक्षीस

आता या सर्वांवर खुद्द विराट कोहलीनेच उत्तर दिले आहे. विराट कोहली कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते.' तो पुढे म्हणाला की, 'लोकं याने काय केले? असे म्हणू शकतात. पण, ज्यावेळी आता पुढे जायला हवे आणि अजून काहीतरी मिळवायला हवे असा विचार करता त्यावेळी तुमचे तुमचे काम पूर्ण झाले आहे अशी भावाना होते.'

हेही वाचा: विराटच्या 'या' निर्णयाचा मला धक्काच बसला : पाँटिंग

विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत (Virat Kohli Captaincy) अजून एक गोष्ट बोलली. तो म्हणाला की, 'तुम्हाला लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचे नसते.' विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही (Ricky Ponting) विराटच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र तो पुढे असं ही म्हणाला की, विराटच्या निर्णयानंतर मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. त्यावेळी मला असे वाटले की मी २ वर्ष जास्त कॅप्टन्सी केली.

Web Title: Virat Kohli First Statement After Stepping Down As Test Captain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top