esakal | लग्नाच्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिलं 'स्पेशल गिफ्ट'!
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Anushka-Sharma

तिन्ही प्रकारात मी निर्णायक योगदान देऊ शकतो यावर माझा विश्‍वास आहे. केवळ कोणता प्रकार खेळत आहोत त्यानुसार फलंदाजीचा मोड बदलत रहावा लागतो.

लग्नाच्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिलं 'स्पेशल गिफ्ट'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : जबरदस्त आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यासह मालिका विजय ही तर माझ्यासाठी लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाची अविस्मरणीय भेट होती, असे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुदधच्या मालिका विजेतेपदानंतर बोलताना व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 11 डिसेंबर 2017 रोजी विराट कोहली अनुष्का शर्मासह शूभमंगल झाले होते. आणि बरोबर काल 11 डिसेंबर 2019 रोजी विराटने 29 चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70 धावांची तुफानी खेळी साकार केली त्यामुळे भारताने 240 धावा उभारून 67 धावांनी सामन्यासह मालिकाही जिंकली. 

- Happy Birthday Yuvraj Singh : भारताचा 'जिगरबाज मॅच विनर' झाला 38 वर्षांचा!

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला मिळालेली ही फारच खास अशी भेट होती. ट्‌वेन्टी-20 प्रकारातील मी एक अफलातून खेळी साकार केली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही प्रथम फलंदाजी करताना थाटात विजय मिळवला होता, असे विराटने सामन्यानंतर सांगितले. 

- Ranji Trophy 2019 : विदर्भाच्या गणेश सतीशने मोडला 28 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

तिन्ही प्रकारात मी निर्णायक योगदान देऊ शकतो यावर माझा विश्‍वास आहे. केवळ कोणता प्रकार खेळत आहोत त्यानुसार फलंदाजीचा मोड बदलत रहावा लागतो. पुढील काळात टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा आहे माझ्यासाठी ही खेळी स्फूर्ती देणारी आहे. ही विश्‍वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे त्यामुळे तेथील लांबवर असलेल्या सीमारेषांचाही विचार करून तयारी करावी लागेल असे विराट म्हणाला.

- Ranji Trophy 2019 : मुंबईचा बडोद्यावर 309 धावांनी दणदणीत विजय

loading image