
विराट कोहलीने राशिदला दिले खास गिफ्ट, क्रिकेट जगतात रंगली चर्चा
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. दरम्यान तो सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याने अफगानिस्तानचा अष्टपैलू राशिद खानला खास गिफ्ट दिलं आहे. सध्या त्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
राशिदने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने विराटनं त्याला गिफ्ट दिल्याची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये विराट आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसत आहे. तर राशिद गुजरात टायटन्सच्या जर्सीत पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ गुरुवारी वानखेडे स्टेडिअम भिडणार आहेत. तत्पुर्वी , विराटने राशिदला बॅट दिल्यामुळे क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आलं आहे.
राशिदने व्हिडीओ शेअर कताना त्याला कॅप्शनदेखील दिली आहे. 'विराट कोहली तुला भेटून नेहमी छान वाटतं. या गिफ्टसाठी मी तुझा आभारी आहे. ' अशी भावना राशिदने व्यक्त केले.
मात्र, विराटने राशिदला काय गिफ्ट दिलं आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. कारण त्यानं नेमकं काय गिफ्ट दिलं याचा उल्लेख केलेला नाही. परंतु त्या व्हिडओमध्ये बॅट पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा विराट बॅटनी खेळण्याची अॅक्शन करतो. आणि त्यानंतर राशिददेखील त्या बॅटने खेळताना दिसला. त्यावरुन क्रिकेट जगतात विराटनं राशिदला बॅट गिफ्ट दिली असल्याची चर्चा रंगली आहे.
गुजरात टायटन्सने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केलं आहे. या सीझनची सर्वात यशस्वी टीम ठरला आहे. फ्रेंजायझीने दाखवलेला हार्दिक पांड्यावरील विश्वास त्याने सार्थ ठरवला. कर्णधार पदावरुन पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीने पहिलाच सीझन खेळला आहे. राशिद खान मागील सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. यंदाच्या सीझनमध्ये तो गुजरातकडून खेळताना दिसत आहे.