
IPL नंतर टीम इंडियामध्ये खेळणार 'हे' धाकड गोलंदाज!
आयपीएल संपल्यानंतर भारताला 9 ते 19 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तीन धाकड वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. आयपीएल 2022 मध्ये या तीन वेगवान गोलंदाजानी विरोधी संघाच्या फलंदाजांचे बोलती बंद केले आहे. (indian cricket team South Africa t20)
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल 2022 मध्ये तिच्या स्पीडने फलंदाजांना सळोकी पळो करून सोडले आहे. उमरान मलिकने 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम उमरान मलिकच्या नावावर आहे. उमरान मलिकने या हंगामात 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे.
मोहसीन खानने त्याच्या गोलंदाजीने सातत्याने विकेट्स घेत आहे, आणि प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. त्यांनी आयपीएलमध्ये हंगामात एप्रिलच्या उत्तरार्धात पदार्पण केले आहे. मोहसीनने या हंगामात आठ सामने खेळले आहे. त्यामध्ये 6.08 च्या इकॉनॉमी रेटने 10 विकेट घेतले आहेत. मोहसीनवर भारतीय निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे.
आयपीएल 2022 मध्ये डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप पंजाब किंग्ससाठी उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने 13 सामन्यांत 7.82 च्या इकॉनॉमी रेटने दहा विकेट्स घेतल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना त्याचा7.31 चा इकॉनॉमी रेट आहे. जे या टप्प्यातील सर्व गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. त्यामुळे अर्शदीप आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवू शकतो.