Virat Kohli | VIDEO : 'अश्विननं आपलंच डोकं चालवलं... विराटने सांगितला शेवटच्या चेंडूचा भन्नाट किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli hails Ravichandran Ashwin for clever leave on wide delivery in final over

Virat Kohli | VIDEO : 'अश्विननं आपलंच डोकं चालवलं... विराटने सांगितला शेवटच्या चेंडूचा भन्नाट किस्सा

Virat Kohli Ind va Pak : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून हाय-व्होल्टेज सामना जिंकला. शेवटच्या षटकात या सामन्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खेळाडूंवर खूप दडपण होते, मात्र या सगळ्याला न जुमानता अश्विनने हुशारीने काम करत भारताला सामना जिंकूण दिला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विराट सहकारी खेळाडू अश्विनचे ​​खूप कौतुक करताना दिसत आहे.

हेही वाचा: Hardik Pandya : पांड्या म्हणतो; संघ जिंकत असताना 80 धावा करणं मला आवडत नाही

विराटने शेवटच्या चेंडूवरचा भन्नाट किस्सा कॅमेऱ्यावर शेअर केली आहे. तो म्हणाला की, दिनेश कार्तिक आऊट झाला होता, मग मी अश्विनला कव्हरवरून शॉट मारायला सांगितलं, पण अश्विनने खूप धाडसी निर्णय घेतला. पुन्हा एकदा विराट भारतीय संघासाठी सामन्याचा हिरो ठरला. या सामन्यात कोहलीने 154.72 च्या स्ट्राईक रेटने 53 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 मोठे षटकार मारले.

हेही वाचा: Video : ना नो-बॉल, ना वाइड, तरीही आफ्रिकेने फुकट दिल्या 5 धावा, काय सांगतो नियम?

भारतीय संघाचा समावेश सुपर-12 च्या ग्रुप 2 मध्ये आहे. आतापर्यंत सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. बांगलादेश गट-2 मध्ये अव्वल आहे. बांगलादेश आणि भारताने पहिला सामना जिंकला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला, त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.