INDvsSA : हेंड्रिक्‍सच्या अंगावर धावल्याने आयसीसीची विराटला तंबी; नावावर एक दोषांकही

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली याला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ताकीद देण्यात आली असून, त्याच्या नावावर एक दोषांकही नोंदविण्यात आला आहे. 

बंगळूर - भारताचा कर्णधार विराट कोहली याला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ताकीद देण्यात आली असून, त्याच्या नावावर एक दोषांकही नोंदविण्यात आला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात गोलंदाज ब्यूरन हेंड्रिक्‍सच्या अंगावर धावून गेल्यामुळे त्याच्यार ही कारवाई करण्यात आली. त्याने आचारसंहितेच्या लेव्हल एक नियमाचा भंग केल्याचे स्पष्ट झाले. कोहलीने आपली चूक कबूल केली. 

गैरवर्तनाबद्दल दोषांक देण्यास सुरवात झाल्यापासून कोहलीची ही तिसरी चूक होती. त्याच्या नावावर एकूण तीन दोषांक असून, यातील दोन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील, तर विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील आहे. 

तिसऱ्या सामन्यात भारताच्या डावातील पाचव्या षटकांत कोहलीने धाव घेत असताना हेंड्रिक्‍स याला कोपर मारले. या घटनेची दखल घेत सामना अधिकाऱ्यांनी कोहलीला दोषी ठरवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli has been warned about abuses on the ground