Virat Kohli Vs Shubman Gill : विराटची फलंदाजी सदोष, शुभमन गिल तर तेंडुलकरसारखा... माजी खेळाडूचं निरीक्षण

Virat Kohli Vs Shubman Gill
Virat Kohli Vs Shubman Gillesakal

Virat Kohli Vs Shubman Gill : नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 च्या हंगामात शुभमन गिलने 17 सामन्यात 890 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. शुभमन गिलने 2023 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम देखील केला. मात्र गिलला आयपीएलच्या एका हंगामात 900 पेक्षा जास्त धावा करण्याच्या विराटच्या विक्रमाशी बरोबरी करण्यात अपयश आले. गिल सध्या भारतीय संघासोबत WTC ची फायनल खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. तो भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबत सामन्यात सलामी देण्याची शक्यता देखील आहे.

Virat Kohli Vs Shubman Gill
Ravi Shastri Virat Kohli WTC : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटची सकाळ वेगळीच असते... रवी शास्त्रींचा कांगारूंना इशारा

गेल्या काही काळापासून भारतातील अनेक दिग्गज खेळाडू शुभमन गिलचे कौतुक करत आहेत. त्याची तुलना थेट विराट कोहलीशी करून तो भारतीय संघातली पुढचा विराट असल्याचे अनेकांनी मतप्रदर्शन केले आहे. आता भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने तर शुभमन गिलची तुलना विराटशी नाही तर थेट सचिन तेंडुलकरशी केली.

मोहम्मद कैफ म्हणाला की, 'सचिन हा खूप ऑर्गनाईज फलंदाज आहे. जर मी सचिन आणि विराटची तुलना केली तर विराटच्या फलंदाजीत काही कच्चे दुवे दिसतील. तो 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात ऑऊट ऑफ फॉर्म होता. जेम्स अँडरसनने विराटला ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करत खूप सतावले आहे. याच्यावर विराटकडे अजून तरी उत्तर नाहीये. तो त्या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप होता.'

Virat Kohli Vs Shubman Gill
WTC Final Ind vs Aus : दोन जागांसाठी चार खेळाडू, संघ निवडीबाबत रोहित पुरता अडकला

विराट कोहली आणि शुभमन गिलची तुलना करत कैफ पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की शुभमन गिलचे फलंदाजीचे तंत्र हे सचिन तेंडुलकर सारखे आहे. एका क्षणाला त्याला बाद करणे खूप अवघड आहे असे वाटते. त्याच्या फलंदाजीत सध्या तरी कोणतीही त्रुटी किंवा कच्चा दुवा दिसत नाहीये. विराट आणि सचिन हे दोघेही दिग्गज आहेत. मी दोघांसोबतही खेळलो आहे. मात्र विराटच्या फलंदाजीत कच्चे दुवे आहेत.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com