WTC Final Ind vs Aus : दोन जागांसाठी चार खेळाडू, संघ निवडीबाबत रोहित पुरता अडकला

WTC फायनलच्या प्लेइंग-11 बाबत कर्णधार रोहित शर्मासमोर नवे टेन्शन...!
WTC Final Ind vs Aus
WTC Final Ind vs Aus

WTC Final Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा हायव्होल्टेज सामन्यात यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाला यंदा जेतेपद पटकावण्याची इच्छा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 पैकी निम्म्याहून अधिक जागा निश्चित आहेत. पण तरीही 4 खेळाडूंमध्ये डाव पेच अडकला आहे.

कर्णधार रोहित शर्मासमोर प्लेइंग 11 च्या निवडीबाबत पेच अडकला आहे. अंतिम सामन्यात यष्टिरक्षक म्हणून कोणता खेळाडू खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. यासाठी केएस भरत आणि इशान किशन यांच्यात चुरश आहे.

WTC Final Ind vs Aus
WTC Final 2023: अजिंक्य रहाणे अन् शार्दुल ठाकूरचे पुनरागमन, 3 खेळाडू संघाबाहेर

इशान किशनने प्रथम श्रेणी कारकिर्दीत 48 सामने खेळले आहेत तर भरतने 86 सामने खेळले आहेत. इशानने 6 शतकांच्या मदतीने 2985 धावा केल्या आहेत, तर भरतने 9 शतकांच्या मदतीने 4707 धावा केल्या आहेत. इशानची सरासरी 38.76 आणि भरताची सरासरी 37.95 आहे. या दोन्ही खेळाडूंची प्रथम श्रेणीतील कारकीर्द अप्रतिम राहिली आहे.

मात्र आतापर्यंत इशानला भारताकडून एकही कसोटी खेळायला मिळालेली नाही. तर भरतने संपूर्ण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली आहे. मात्र यादरम्यान त्याला 6 डावात केवळ 44 धावा करता आल्या. म्हणजेच संपूर्ण मालिकेत त्याला एकही चांगली खेळी खेळता आली नाही, अशा स्थितीत निवडीची स्पर्धा चुरशीची होणार आहे.

WTC Final Ind vs Aus
Wrestlers Protest: "त्या अफवेवर विश्वास ठेवू नका', बजरंग पुनियाचा हात जोडलेला व्हिडिओ व्हायरल

दोन फिरकीपटूंपैकी एक खेळणार?

भारतीय कर्णधार रोहित शर्मा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये एक किंवा दोन फिरकी गोलंदाज घेणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघेही अंतिम सामना खेळल्यास शार्दुल ठाकूरला बाहेर बसावे लागेल.

दुसरीकडे शार्दुल खेळला तर दोन स्पिनरपैकी एकच खेळू शकणार आहे. अशा स्थितीत संघ निवडण्याचे मोठे आव्हान व्यवस्थापनासमोर असेल.

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा पूर्ण संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com