Virat Kohli Instagram Story : प्रसिद्धी म्हणजे एक रोग.... विराट कोहलीची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

Virat Kohli Instagram Story
Virat Kohli Instagram Story esakal

Virat Kohli Instagram Story : विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. तो आपला हा वेळ आपल्या कुटुंबासोबत फिरण्यात घावलतोय. बांगलादेश दौऱ्यानंतर विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्यात आला होता. आता हे सर्व खेळाडू श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा मैदानावर उतरणार आहेत.

दरम्यान, संपूर्ण संघ पहिल्या वनडेसाठी गुवाहाटीत जमत असतानाच विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामवर ठेवलेली एक स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. या स्टोरीची पहिलीच ओळ प्रसिद्धीचा हव्यास हा एका रोगासारखा असतो अशी आहे.

Virat Kohli Instagram Story
Rishabh Pant IPL 2023 : BCCI भरायला लावणार बील! दुखापग्रस्त पंतला मिळणार IPL 2023 चा संपूर्ण पगार

विराट कोहलीने आज आपल्या इन्स्टाग्रामवर दिवंगत अभिनेता इरफान खानचा कोट आणि हॉलिवूड अभिनेता टॉम हँक यांचा व्हिडिओ ठेवला होता.

'प्रसिद्धीचा हव्यास हा एक रोग आहे आणि एक दिवस मी त्या रोगापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करेन. जेथे प्रसिद्धीने काही फरक पडत नाही. जिथे आयुष्याची अनुभूती घेणं आणि फक्त ठीक असणंच पुरेसं असतं.' हा कोट इरफान खान यांचा आहे.

तर व्हिडिओ स्टोरीमध्ये टॉम हँक म्हणत असतो की, 'कदाचीत मला माहितं असतं की हा काळ देखील निघून जाईल. तुला आता वाईट वाटतंय? तुला राग आला आहे? मात्र हा क्षण देखील निघून जाणार आहे. तुला वाटेल की तुला सगळी उत्तर माहिती आहेत. तुला वाटेल की आता सर्वजण तुझा मुद्दा समजू शकतायत.'

Virat Kohli Instagram Story
AUS vs RSA :पॅट कमिन्सने राहुल द्रविडचा कित्ता गिरवला; उस्मान ख्वाजाला 5 धावांची गरज होती मात्र...

विराट कोहलीच्या या इन्स्टा स्टोरीमागे काय कारण आहे हे चाहत्यांना उमगत नाहीये. त्यामुळे विराटच्या या इन्स्टा स्टोरीची जास्तच चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहली इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करतोय. यापूर्वी त्याने पत्नी अनुष्कासोबत सुट्टी एन्जॉय करतानाचा फोटो शेअर केला होता. हे दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुट्टीवर गेले होते. (Sports Latest News)

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com