Rishabh Pant IPL 2023 : BCCI भरायला लावणार बील! दुखापग्रस्त पंतला मिळणार IPL 2023 चा संपूर्ण पगार

Rishabh Pant IPL 2023 Salary
Rishabh Pant IPL 2023 Salary esakal

Rishabh Pant IPL 2023 Salary BCCI : भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतच्या अपघातानंतर बीसीसीआयने त्याच्या उपचारांची सर्व जबाबदारी स्विकारली. बीसीसीआयने त्याला मुंबईला एअर लिफ्ट करून मुंबई आणले आणि त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील केली. भारतीय संघासाठी ऋषभ पंत एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे बीसीसीआय तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा आणि मैदानावर परतावा यासाठी कंबर कसली आहे.

Rishabh Pant IPL 2023 Salary
AUS vs RSA :पॅट कमिन्सने राहुल द्रविडचा कित्ता गिरवला; उस्मान ख्वाजाला 5 धावांची गरज होती मात्र...

दरम्यान, ऋषभ पंतच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो अजून 6 ते 9 महिने काही मैदानावर परतणार नाही अशी माहिती समोर आली. पंत आयपीएल 2023 चा हंगाम तसेच वनडे वर्ल्डकपला देखील मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स त्याला आयपीएल 2023 चा 16 कोटी पगार देणार का अशी चर्चा सुरू होती.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतला आयपीएल 2023 चा संपूर्ण 16 कोटी पगार मिळणारच आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या केंद्रीय करारानुसार मिळणारे 5 कोटी रूपये देखील मिळणार आहे.

Rishabh Pant IPL 2023 Salary
WTC Final : AUS vs RSA तिसरी कसोटी अनिर्णित; भारताच्या WTC फायनल खेळण्यावर झालाय परिणाम

बीसीसीआय पंतला किती रक्कम देणार?

- ऋषभ पंतचा बीसीसीआयशी केंद्रीय करार आहे. त्यामुळे त्याला वर्षाला 5 कोटी रूपये मिळतात.

- दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या पंतला बीसीसीआय पूर्ण रक्कम अदा करणार आहे.

- याचबरोबर आयपीएलला मुकणाऱ्या पंतला त्याचा 16 कोटी वार्षिक पगार देखील पूर्णपणे मिळणार असून त्याची जबाबदारी बीसीसीआय उचलणार आहे.

(Sports Latest News)

Rishabh Pant IPL 2023 Salary
Rahul Dravid On Suryalumar Yadav : सूर्यानं लहानपणी नक्कीच माझी बॅटिंग बघितली नाही... द्रविडने सूर्याची खेचली

बीसीसीआयच्या केंद्रीय करार केलेले सर्व खेळाडूंचा वीमा उतरवण्यात आलेला असतो. नियमानुसार दुखापतीमुळे आयपीएलला खेळाडू मुकला तर त्याचा संपूर्ण पगार हा बोर्ड करते. हे पैसे फ्रेंचायजीकडून नाही तर वीमा कंपनीकडून घेतली जातात.

ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. पंतचे गुडघ्यातील अँटेरिअर क्रुशिएट लिगामेंट (ACL) आणि मेडिअल कोलॅटरल लिगामेंट (MCL) हे दोन्ही टीअर झाले आहेत. या दुखापतीतून पंतला सावरण्यासाठी जवळापस 6 ते 9 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com