Ashes Series Virat Kohli : सामना इंग्लंड अन् ऑस्ट्रेलियाचा चर्चा मात्र विराट कोहलीचीच!

Ashes Series Virat Kohli
Ashes Series Virat Kohliesakal

Ashes Series Virat Kohli : एजबेस्टन येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडकडून जो रूट आणि ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. उस्मान ख्वाजाला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. मात्र असं असलं तरी या सामन्यादरमन्यान समालोचक केविन पिटरसन आणि कुमार संगकारा यांच्या बोलण्यात विराटचाच उल्लेख येत होता.

Ashes Series Virat Kohli
ICC ने घेतली मोठी ॲक्शन! सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाचे WTC पॉईंट्स कापले जाणार; जाणून घ्या काय झालं?

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा एक फलंदाज कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच यष्टीचीत झाला. यानंतर विराट कोहली देखील या वर्षी कारकिर्दीत पहिल्यांदाच यष्टीचीत झाल्याचा उल्लेख समालोचक कुमार संगकारा आणि केविन पिटरसन यांनी केला.

पिटरसन स्काय स्पोर्टशी बोलताना म्हणाला की, 'तो फिरकीविरूद्धचा चांगला फलंदाज आहे. ते फिरकीला बॅकफूटवर खेळतात आणि त्यांच्याकडे मनगटाने फटके मारण्याचे कसब आहे. तुम्ही विराट कोहलीला फिरकी गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन खेळताना क्वचितच पाहिले असेल. विशेष म्हणजे तो फिरकीवर स्वीप आणि रिव्हर्स स्वीप देखील मारत नाही. तुम्ही त्याला फलंदाजी करताना पाहा.'

Ashes Series Virat Kohli
Pat Cummins Captaincy : पहिला डाव फसला तरी कमिन्सनं करून दाखवलं, रोहित कधी शिकणार?

पिटरसननंतर संगकाराने देखील विराट कोहलीचे कौतुक केले. तो म्हणाला की, 'विराट हा आयपीएल मोडमध्ये फलंदाजी करतो ना? अनेक फलंदाजांना स्टेप आऊट होऊन फलंदाजी करणे आवडते. त्यामुळे ते गोलंदाजांना त्यांच्या लेंथवर गोलंदाजी करण्याची मुभा देत नाहीत. त्यामुळे फिरकीविरूद्ध खेळताना तुमच्या पायाची हालचाल फार महत्वाची असते. मात्र आता फलंदाज ते करताना दिसत नाहीयेत. तुम्ही फिरकीवर एकेरी धाव घेत नाही थेट मैदानाबाहेर मारण्याचा प्रयत्न करता आणि खरं आहे.'

विराट कोहली WTC Final नंतर सध्या सुट्टीचा आनंद घेतोय. आता विराट कोहलीला आपण पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर खेळताना पाहणार आहोत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com